सेक्स स्कॅंडल प्रकरणी आपचे निलंबित आमदार संदीप कुमार अटकेत
By Admin | Updated: September 4, 2016 00:31 IST2016-09-03T23:47:01+5:302016-09-04T00:31:08+5:30
सेक्स स्कँडल प्रकरणी आपचे निलंबित आमदार संदीप कुमार यांना पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

सेक्स स्कॅंडल प्रकरणी आपचे निलंबित आमदार संदीप कुमार अटकेत
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 03 - सेक्स स्कॅंडल प्रकरणी आपचे निलंबित आमदार संदीप कुमार यांना पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी पीडित महिलेने संदीप कुमारांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर दिल्लीच्या रोहिणी पोलिसांनी संदीप कुमार यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर शनिवारी रात्री उशिरा त्यांना पोलिसांनी अटक केली.
गेल्या दोन दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातून सेक्स स्कॅंडल प्रकरणी संदीप कुमार यांची हकालपट्टी केली होती. संदीप कुमार यांच्याकडे बालकल्याण आणि सामाजिक न्याय ही खाती होती. केजरीवालांच्या मंत्रिमंडळातील तिस-या क्रमांकाचे मंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.
दरम्यान, संदीप कुमार यांना उद्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे.