मुंडेच्या गाडीला धडक देणा-या ड्रायव्हरला जामीन

By Admin | Updated: June 3, 2014 18:11 IST2014-06-03T18:11:07+5:302014-06-03T18:11:17+5:30

केंद्रीय ग्रामविकास मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला धडक देणा-या ड्रायव्हरची जामीनावर सुटका झाली.

Suspend driver for Munde's car | मुंडेच्या गाडीला धडक देणा-या ड्रायव्हरला जामीन

मुंडेच्या गाडीला धडक देणा-या ड्रायव्हरला जामीन

ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. ३ - केंद्रीय ग्रामविकास मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला धडक देणा-या ड्रायव्हरची जामीनावर सुटका झाली. गुरविंदर सिंग असे त्या चालकाचे नाव असून ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने त्याची सुटका केली आहे.
बीड व परळी येथील सत्कारासाठी दिल्लीहून महाराष्ट्रात येण्यास निघालेल्या मुंडेच्या गाडीला विमानतळाच्या दिशेने जात असताना एका वाहनाने धडक दिली.  पोलिसांनी गाडीचालकाला अटक करत त्याची चौकशी सुरू केली होती. अखेर मंगळवारी संध्याकाळी त्याची जामीनावर सुटका झाली.
मुंडेच्या निधनामुळे महाराष्ट्रात शोककळा पसरली असून एक महान नेता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
 

Web Title: Suspend driver for Munde's car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.