इसिसचे ट्विटर अकाऊंट हाताळणा-या संशयितास अटक
By Admin | Updated: December 13, 2014 12:11 IST2014-12-13T11:28:37+5:302014-12-13T12:11:40+5:30
इसिसचे सर्वात यशस्वी ट्विटर अकाऊंट हाताळणा-या संशयित इसमास बंगळुरू येथून अटक करण्यात आली आहे.

इसिसचे ट्विटर अकाऊंट हाताळणा-या संशयितास अटक
ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. १३ - @ShamiWitness या नावाने ‘इसिस’चे सर्वात यशस्वी ट्विटर अकाऊंट हाताळणा-या संशयित इसमास अटक करण्यात आली आहे. मेहदी ( वय २४) असे त्याचे नाव असून तो मूळचा बंगालचा असल्याचे समजते.
मेहदी हा इसिस’चे अकाऊंट हाताळत होता, या वृत्तानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरवात केली व अखेर त्याला अटकही केली. मात्र आपण काहीही चुकीचे केलेले नाही तसेच भारताविरुद्ध कोणतेही युद्ध पुकारलेले नसल्याचे त्याने म्हटले. मेहदी चालवत असलेल्या ट्विटर अकाऊंटचे 17,700 समर्थक आहेत, असे वृत्त ‘चॅनल 4’ या ब्रिटिश वृत्तवाहिनीने दिले आहे. हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर @ShamiWitness हे अकाऊंट बंद करण्यात आले. हे ट्विटर अकाऊंट गेल्या वर्षी प्रसिद्ध झाले होते आणि त्यावर इसिसची माहिती व सिरिया व इराकमधील हल्ल्यांची छायाचित्रे पोस्ट करून युवकांना इसिसमध्ये भरतीचे आवाहन केले जात होते, असे ‘चॅनल 4’ने म्हटले आहे