सासूने सुनेवर केला वेश्याव्यवसायाचा आरोप, सुनेसह दोघे अटकेत
By Admin | Updated: February 28, 2017 23:06 IST2017-02-28T23:06:41+5:302017-02-28T23:06:41+5:30
गेल्या काही काळात सर्वसामान्य परिसरात सेक्स रॅकेट उघडकीस येण्याचे प्रममाण वाढले आहे. हरयाणातील पलवल शहरातही असेच एक

सासूने सुनेवर केला वेश्याव्यवसायाचा आरोप, सुनेसह दोघे अटकेत
>ऑनलाइन लोकमत
चंदिगड, दि. 28, - गेल्या काही काळात सर्वसामान्य परिसरात सेक्स रॅकेट उघडकीस येण्याचे प्रममाण वाढले आहे. हरयाणातील पलवल शहरातही असेच एक विचित्र प्रकरण उघडकीस आले आहे. येथील शहरी भागात राहणाऱ्या एका महिलेने आपली सून घरात वेश्याव्यवसाय करत असल्याचा आरोप केला. तसेच तिच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी सदर महिलेच्या घरातून सूनेसह दोन तरुणांना अटक केली आहे.
आपला मुलगा गेल्या वर्षभरापासून बेपत्ता आहे. त्याचा अद्याप शोध लागलेला नाही. मुलगा बेपत्ता झाल्यापासून सून पैशांच्या मोहाने वेश्याव्यवसाय करत आहे, असा आरोप सदर महिलेने पोलिसांना दिलेल्या आपल्या तक्रारीतून केला आहे. सोमवारी गस्तीवर असताना या महिलेने आपल्याकडे लेखी तक्रार दिली, असे त्या परिसरातील ठाणेदार सुमन कुमार यांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत सदर महिलेच्या घरातून सुनेसह अन्य दोन युवकांना अटक केली आहे. या प्रकरणी चौकशी सुरू असून अन्य लोकांचीही चौकशी होऊ शकते, असे पोलिसांनी सांगितले.