शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

CoronaVirus: कोरोना पसरवत असल्याच्या संशयातून तबलिगी जमातच्या एकाला मारहाण; रुग्णालयात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2020 9:22 AM

तबलिगी जमातच्या कार्यक्रमाहून परतलेल्या तरुणाला ग्रामस्थांची मारहाण

दिल्ली: निझामुद्दीनमध्ये आयोजित केल्या गेलेल्या मरकजमुळे देशभरातून तबलिगी जमातला रोषाला सामोरं जावं लागतं आहे. दिल्लीच्या बवानामध्ये एका २२ वर्षीय तरुणाला जबर मारहाण करण्यात आली. त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. कोरोना पसरवल्याचा कट रचल्याच्या आरोपातून त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी बुधवारी याबद्दलची माहिती दिली. हा तरुण बवानाच्या हरेवली गावचा रहिवासी होता.मारहाणीत मरण पावलेला तरुण तबलिगी जमातच्या एका कार्यक्रमासाठी मध्य प्रदेशातल्या भोपाळमध्ये गेला होता. तो ४५ दिवसांनंतर भाजीपाल्याच्या एका ट्रकमधून दिल्लीला परतला. त्याला आझादपूरमधल्या भाजी मंडईत रोखण्यात आलं. मात्र तपासणीनंतर त्याला सोडलं गेलं. तो गावात पोहोचल्यानंतर काही जणांनी त्याच्याबद्दल अफवा पसरवली. तो कोरोना विषाणूचा फैलाव करण्याच्या हेतूनं योजना आखून गावात परतल्याची अफवा गावभर पसरली, अशी माहिती पोलिसांनी दिली.तबलिगी जमातच्या कार्यक्रमावरुन परतलेल्या तरुणाला रविवारी काही जणांनी शेतात नेलं. तिथे त्याला जबर मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आली.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या