केरळच्या किनाऱ्यावर आढळली संशयास्पद विदेशी नौका
By Admin | Updated: July 5, 2015 23:45 IST2015-07-05T23:45:38+5:302015-07-05T23:45:38+5:30
केरळच्या अलापुझा येथील समुद्र किनाऱ्यावर संशयास्पदरीत्या आढळलेली एक विदेशी नौका तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे. ही नौका विझिनजाम येथे चौकशीसाठी आणण्यात आली.

केरळच्या किनाऱ्यावर आढळली संशयास्पद विदेशी नौका
अलापुझा (केरळ) : केरळच्या अलापुझा येथील समुद्र किनाऱ्यावर संशयास्पदरीत्या आढळलेली एक विदेशी नौका तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे. ही नौका विझिनजाम येथे चौकशीसाठी आणण्यात आली.
केरळ पोलिसांनी या नौकेवर असलेल्या सर्व १२ कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. हे सर्व जण इराणी असून त्यांची चौकशी सुरू आहे, असे तटरक्षक दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
केरळ पोलिसांसह केंद्र आणि राज्य गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली आहे. या नौकेवरून प्रतिबंधित उपग्रह फोनही हस्तगत करण्यात आले आहेत.