मंद्रुप येथे महिलेचा संशयास्पद मृत्यू

By Admin | Updated: May 9, 2014 00:18 IST2014-05-08T20:53:49+5:302014-05-09T00:18:04+5:30

सोलापूर :

Suspected death of a woman at Mandrup | मंद्रुप येथे महिलेचा संशयास्पद मृत्यू

मंद्रुप येथे महिलेचा संशयास्पद मृत्यू

सोलापूर :
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला.
लक्ष्मी जेटप्पा रुगीकर (वय २१, रा. इंदिरानगर, मंद्रुप) असे मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे. दोन वर्षांपूर्वी तिचे लग्न झाले होते. पती जेटप्पा हा वाळूच्या गाडीवर काम करीत होता. पण अलीकडे कामधंदा सोडून तो घरी बसला होता. पत्नीला माहेरून पैसे आण म्हणून त्रास देत होता. त्यामुळे ती माहेरी आल्यावर घरच्यांनी समजूत घालून परत नांदायला पाठविले होते. बुधवारी मध्यरात्री ती बेशुद्ध पडली म्हणून टमटममधून त्याने सोलापुरात उपचारास आणले होते. पण ती मरण पावल्याचे डॉक्टरांनी सांगताच तो मंद्रुपला परतला. वडील सुरेश नंदुरे यांनी तक्रार केल्यावर मंद्रुप पोलिसांनी शवविच्छेदन केले. पोलीस ठाण्यात अकस्मात मयत अशी नोंद करण्यात आली आहे.
 

Web Title: Suspected death of a woman at Mandrup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.