हरिद्वारमध्ये संशयिताला अटक
By Admin | Updated: January 20, 2016 01:51 IST2016-01-20T01:51:39+5:302016-01-20T01:51:39+5:30
हरिद्वार : इस्लामिक स्टेट सिरियाशी संबंध असलेल्या संशयित युवकाला मंगळवारी रात्री हरिद्वार जिल्ातील रुरकीजवळच्या मंगलूर येथे अटक करण्यात आली. इंटेलिजन्स ब्युरो तसेच उत्तराखंडच्या विशेष कृती पथकाने ही संयुक्त कारवाई केली. अटक करण्यात आलेला युवक स्थानिक असून त्याच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आला. त्याच्याकडे सिरियातील अनेक मोबाईल क्रमांक आढळले. चौकशी पथकाने त्याच्या ओळखीबाबत गुप्तता पाळली असली तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याचे नाव अखलाख असल्याचे कळते. दरम्यान दिल्ली पोलिसांचे पथक चौकशीसाठी हरिद्वारकडे रवाना झाले असून या संशयिताचा पठाणकोट हवाईतळावरील हल्ल्याशी संबंध आहे काय, याचा शोध घेतला जात आहे.

हरिद्वारमध्ये संशयिताला अटक
ह िद्वार : इस्लामिक स्टेट सिरियाशी संबंध असलेल्या संशयित युवकाला मंगळवारी रात्री हरिद्वार जिल्ह्यातील रुरकीजवळच्या मंगलूर येथे अटक करण्यात आली. इंटेलिजन्स ब्युरो तसेच उत्तराखंडच्या विशेष कृती पथकाने ही संयुक्त कारवाई केली. अटक करण्यात आलेला युवक स्थानिक असून त्याच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आला. त्याच्याकडे सिरियातील अनेक मोबाईल क्रमांक आढळले. चौकशी पथकाने त्याच्या ओळखीबाबत गुप्तता पाळली असली तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याचे नाव अखलाख असल्याचे कळते. दरम्यान दिल्ली पोलिसांचे पथक चौकशीसाठी हरिद्वारकडे रवाना झाले असून या संशयिताचा पठाणकोट हवाईतळावरील हल्ल्याशी संबंध आहे काय, याचा शोध घेतला जात आहे.