शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

परराष्ट्र विभागावर सुषमा स्वराज यांची अमीट छाप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2019 4:15 AM

वुई मिस यू : थायलंड, इस्रायलच्या राजदूतांचे ट्विट

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वात सुषमा स्वराज यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला नसला तरी परराष्ट्र विभागावर त्यांचीच अमीट छाप आहे. सोशल मीडियावर अनेक देशांचे राजदूत, पररराष्ट्र धोरणाचे अभ्यासक व राजकीय नेत्यांनादेखील याच मनस्वी भावनांना वाट करून दिली. परराष्ट्र मंत्री म्हणून केलेल्या कामगिरीचे अनेकांनी कौतुक केले.

थायलंडचे भारतातील राजदूत सॅम यांनी ट्विटरवर सुषमा स्वराज यांचे आभार मानले. थायलंड देश व मी तुम्हाला कधीही विसरणार नाही, अशा शब्दात राजदूत सॅम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. चीनमध्ये अनेक वर्ष पत्रकार म्हणून काम केलेल्या अनंत कृष्णन म्हणाले की, परराष्ट्र व्यवहार मंत्र्याची अगदी स्थानिक स्तरावर दखल घेण्याची सवय स्वराज यांनी लावली. हीच नवी परंपरा त्यांनी निर्माण केली. गेल्या पाच वर्षात त्यांनी परराष्ट्र विभागाला नवा चेहरा दिला. सहज एकहाती संपर्क करून त्यांनी परदेशातील दूतावासांना अजून जबाबदार बनवले.

इस्रायलचे भारतातील माजी राजदूत डॅनिअल कॅमरून यांनी ‘तुमच्याच कारकिर्दीत मी राजदूत होतो’ अशी आठवण करून दिली. दोन्ही देशांमधील संबंध घनिष्ठ होताना मला साक्षीदार होता आले. तुमच्या इस्त्रायल भेटीदरम्यानचा माझा अनुभव विलक्षण होता, असे कॅमरून म्हणाले. मालदीवच्या परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शाहिद यांनीदेखील स्वराज यांच्या कामगिरीचे कौतुक केले. परराष्ट्र मंत्रिदावर दैदप्यिमान परंपरेची छाप स्वराज यांनी सोडल्याचे नमूद करून ते म्हणाले, मालदीवसाठी तुम्ही सच्च्या मित्रत्त्वाची भूमिका निभावली. भारतीयांसाठी तुमची कार्यकुशलता, कार्यभावना माझ्यासह अनेकांना प्रेरणादायी आहे.

कामाला ‘पर्सनल टच’ देणाऱ्या स्वराजकाँग्रेस खासदार शशी थरूर यांनीदेखील स्वराज यांचे कौतुक केले आहे. नवे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे अभिनंदन करताना थरूर म्हणाले, सुषमा स्वराज यांच्यासमवेत काम करता आले. जयशंकर उत्तम काम करतीलच परंतु कोणत्याही कामाला ‘पर्सनल टच’ देणाºया स्वराज यांना आम्ही कधीही विसरणार नाही.

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराज