सुषमा स्वराज निपुण नाटकी विरोधकांचा हल्लाबोल: चौथ्या दिवशीही काँग्रेस खासदारांचे धरणे
By Admin | Updated: August 8, 2015 00:23 IST2015-08-08T00:23:49+5:302015-08-08T00:23:49+5:30
सोनिया गांधींचा टोला

सुषमा स्वराज निपुण नाटकी विरोधकांचा हल्लाबोल: चौथ्या दिवशीही काँग्रेस खासदारांचे धरणे
स निया गांधींचा टोलानवी दिल्ली : परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी लोकसभेत दिलेल्या निवेदनातील दावा पूर्णपणे खोडून काढताना काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्या नाटक करण्यात निपुण आहेत, असा टोला लगावला. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही स्वराज यांनी चोरट्या पद्धतीने काम केल्याचा आरोप करीत नव्या वादाला तोंड फोडले आहे. या मुद्यावर काँग्रेस माघार घेणार नसल्याचे शुक्रवारी चौथ्या दिवशीही संसद परिसरात सुरू ठेवण्यात आलेल्या निदर्शनांवरून स्पष्ट झाले.काँग्रेसच्या २५ खासदारांना निलंबित करण्याचा तिढा अद्याप संपलेला नाही. लोकसभेत गुरुवारी स्वराज यांनी निवेदनात केलेला बचाव म्हणजे एक नाटक असल्याचे सोनिया गांधी यांनी म्हटले. त्या म्हणाल्या की, सुषमा स्वराज नाटक करीत असून त्यात त्या अतिशय निपुण आहेत. माझ्या जागी असत्या तर सोनिया गांधी यांनी काय केले असते, असा सवाल करीत स्वराज यांनी ललित मोदी यांच्या कॅन्सरग्रस्त पत्नीला मदत केल्याचे समर्थनच केले होते. त्यावर सोनिया म्हणाल्या की, मी कॅन्सरपीडित महिलेला मदत करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला असता मात्र कायद्याचे उल्लंघन करून नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क ) / विरोधकांची एकजूट- आतील पानातचिदंबरम यांचा सवालस्वराज यांनी हस्तक्षेप केला त्याच्या तीन बाजू आहेत. तिघांपैकी कोण खरे बोलत आहेत, हे आम्हाला कळायला हवे. ब्रिटनचे उच्चायुक्त जेम्स बेव्हन, ब्रिटिश खासदार केथ वाझ की सुषमा स्वराज ? असा सवाल माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केला.