सुषमा स्वराज निपुण नाटकी - सोनिया गांधी

By Admin | Updated: August 8, 2015 02:35 IST2015-08-08T02:35:18+5:302015-08-08T02:35:18+5:30

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी लोकसभेत दिलेल्या निवेदनातील दावा पूर्णपणे खोडून काढताना काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्या नाटक

Sushma Swaraj's accomplished drama - Sonia Gandhi | सुषमा स्वराज निपुण नाटकी - सोनिया गांधी

सुषमा स्वराज निपुण नाटकी - सोनिया गांधी

नवी दिल्ली : परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी लोकसभेत दिलेल्या निवेदनातील दावा पूर्णपणे खोडून काढताना काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्या नाटक करण्यात निपुण आहेत, असा टोला लगावला. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही स्वराज यांनी चोरट्या पद्धतीने काम केल्याचा आरोप करीत नव्या वादाला तोंड फोडले आहे. या मुद्यावर काँग्रेस माघार घेणार नसल्याचे शुक्रवारी चौथ्या दिवशीही संसद परिसरात सुरू ठेवण्यात आलेल्या निदर्शनांवरून स्पष्ट झाले.
माझ्या जागी असत्या तर सोनिया
गांधी यांनी काय केले असते, असा
सवाल करीत स्वराज यांनी केला होता. त्यावर सोनिया म्हणाल्या की, मी कॅन्सरपीडित महिलेला मदत करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला असता मात्र कायद्याचे उल्लंघन करून नाही.

Web Title: Sushma Swaraj's accomplished drama - Sonia Gandhi