सुषमा स्वराज यांचा जानेवारीत परदेश दौरा

By Admin | Updated: December 24, 2015 00:06 IST2015-12-24T00:06:47+5:302015-12-24T00:06:47+5:30

पश्चिम आशियासोबतचे संबंध बळकट करण्यासाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज पुढील महिन्यात इस्रायल व पॅलेस्टाईनचा दौरा करणार आहेत.

Sushma Swaraj visits abroad in January | सुषमा स्वराज यांचा जानेवारीत परदेश दौरा

सुषमा स्वराज यांचा जानेवारीत परदेश दौरा

जेरुसलेम : पश्चिम आशियासोबतचे संबंध बळकट करण्यासाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज पुढील महिन्यात इस्रायल व पॅलेस्टाईनचा दौरा करणार आहेत. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या आॅक्टोबरमधील ऐतिहासिक दौऱ्यानंतर स्वराज १६ ते १९ जानेवारीदरम्यान या देशांचा दौरा करतील.
स्वराज यांनी यापूर्वी इस्रायलला विश्वासू साथीदार म्हटले होते. त्यानंतर स्वराज यांच्या परराष्ट्रमंत्रिपदी झालेल्या नियुक्तीची इस्रायलने प्रशंसा केली होती.
स्वराज २००६ ते २००९ यादरम्यान भारत- इस्रायल मैत्री गटाच्या अध्यक्ष होत्या. तेव्हा त्यांनी इस्रायलचा दौरा केला होता. रालोआ सत्तेवर आल्यानंतर इस्रायलमध्ये उभय देशांतील संबंध बळकट करण्याची चर्चा झडू लागली. (वृत्तसंस्था)

Web Title: Sushma Swaraj visits abroad in January