शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
3
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
4
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
5
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
6
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
7
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
8
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
9
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
10
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
11
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
12
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
13
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
14
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
15
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
16
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
17
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
18
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
19
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
20
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का

सुषमा स्वराज यांनी दिला सात वर्षाच्या पाकिस्तानी मुलीला ओपन हार्ट सर्जरीसाठी मेडिकल व्हिसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 14:54 IST

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी बुधवारी एका सात वर्षीय पाकिस्तानी मुलीला तिच्या ओपन हार्ट सर्जरीसाठी व्हिसा देण्याचे निर्देश दिले आहेत.

ठळक मुद्देपरराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी बुधवारी एका सात वर्षीय पाकिस्तानी मुलीला तिच्या ओपन हार्ट सर्जरीसाठी व्हिसा देण्याचे निर्देश दिले आहेत. पाकिस्तानी महिलेने ट्विटवरून सुषमा स्वराज यांच्याकडे मेडिकल व्हिसासाठी मदत मागितली होती.

नवी दिल्ली- परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी बुधवारी एका सात वर्षीय पाकिस्तानी मुलीला तिच्या ओपन हार्ट सर्जरीसाठी व्हिसा देण्याचे निर्देश दिले आहेत. पाकिस्तानी महिलेने ट्विटवरून सुषमा स्वराज यांच्याकडे मेडिकल व्हिसासाठी मदत मागितली होती. त्या मागणीनंतर सुषमा स्वराज यांनी व्हिसा देण्याचे आदेश दिले आहेत. कराचीतून भारतात येण्यासाठी मेडिकल व्हिसा देण्याच्या सूचनाही संबंधित विभागाला दिल्या आहेत.

पाकिस्तानी महिला निदा शोएब यांनी त्याच्या सात वर्षीय मुलीला ओपन हार्ट सर्जरीची गरज असल्याचं ट्विट केलं होतं. या सर्जरीसाठी व्हिसा मिळावा यासाठी ऑगस्टपासून वाट पाहत असल्याचंही ट्विट निदा शोएब या महिलेने केलं होतं. मुलीची सर्जरी करण्याची गरज असून त्यासाठी मेडिकल व्हिसा मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. तुमच्या मदतीची गरज असल्याचंही त्या महिलेने ट्विटमध्ये म्हंटलं आहे. आपल्या मागणीकडे सुषमा स्वराज यांचं लक्ष वेधण्यासाठी त्या महिलेने आणखी एक ट्विट केलं. मुलीला असलेल्या आजारामुळे ती शाळेत जाणं किंवा पळणं अशा साध्या गोष्टीही करू शकत नसल्याचं तिने केलेल्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हंटलं आहे. 

या पाकिस्तानी महिलेच्या मागणीची दखल घेत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी त्यांच्या ट्विटला उत्तर दिलं आहे. ' हो. आम्ही तुमच्या सात वर्षीय मुलीला ओपन हार्ट सर्जरीसाठी भारतात यायला व्हिसा देतो आहे. तिच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी आम्ही प्रार्थना करू, असं स्वराज यांनी ट्विटमध्ये म्हंटलं आहे. पाकिस्तानमधील या सात वर्षीय मुलीची सर्जरी नोएडामधील हॉस्पिटलमध्ये होणार आहे. 

पाकिस्तानातील नागरिकांना मेडिकल व्हिसासाठी सुषमा स्वराज यांनी मदत केल्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून अनेकांना मेडिकल व्हिसा दिल्याचं सांगितलं आहे. ऑगस्ट महिन्यात एका पाकिस्तानी महिलेला कॅन्सरवर उपचार करण्यासाठी मेडिकल व्हिसा देण्यात आला होता.  

सोशल मीडियावर समिश्र प्रतिक्रिया

सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानी मुलीला दिलेल्या मेडिकल व्हिसावरून सोशल मीडियावर समिश्र प्रतिक्रिया उमटत आहे. सुषमा स्वराज यांच्या निर्णयाचं काही नेटिझन्सकडून कौतुक केलं जातं आहे तर काही जण यावर टीकाही करत आहेत. भारत लोकांना आयुष्य देतं तर पाकिस्तान लोकांचं आयुष्य हिरावून घेतं, असं एका ट्विटर युजरने म्हंटलं आहे.पाकिस्तानकडून आपली लोक दररोज मारली जात आहेत, आपणही तसंच वागायला हवं, असंही ट्विट एका युजरने केलं आहे.

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराज