सुषमा स्वराज यांनी दिला होता राजीनामा ?

By Admin | Updated: June 16, 2015 11:18 IST2015-06-16T11:13:43+5:302015-06-16T11:18:08+5:30

आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांना मदत केल्याच्या प्रकरणात नाव समोर आल्यावर सुषमा स्वराज यांनी त्यांचा राजीनामा सादर केला होता असे समजते.

Sushma Swaraj resigned? | सुषमा स्वराज यांनी दिला होता राजीनामा ?

सुषमा स्वराज यांनी दिला होता राजीनामा ?

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १६ - आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांना मदत केल्याचा वाद उफाळण्यापूर्वीच सुषमा स्वराज यांनी त्यांचा राजीनामा सादर केला होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा व संघ नेत्यांची चर्चा केल्यानंतर हा राजीनामा फेटाळून लावल्याची चर्चा आहे. 
आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांना ब्रिटनमधून पोर्तूगालला जाण्यात मदत केल्याने परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज गोत्यात आल्या आहेत. भारतातील प्रसारमाध्यमांपूर्वी हे वृत्त ब्रिटनमधील प्रसारमाध्यमांमध्ये झळकले होते. रविवारी वृत्त प्रकाशित करण्यापूर्वी भारतातील एका इंग्रजी वृत्तवाहिनीने सुषमा स्वराज यांना ईमेल पाठवून त्यांची प्रतिक्रिया मागितली होती. या ईमेलनंतर सुषमा स्वराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन या प्रकरणाची त्यांना सविस्तर माहिती दिली होती. यानंतर दुस-या दिवशी नरेंद्र मोदींनी भाजपा व संघातील वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलवल्याचे समजते. या बैठकीत सुषणा स्वराज यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केले. सरकारची नामूष्की होऊ नये म्हणून राजीनामा देण्यास तयार असल्याचे स्वराज यांनी बैठकीत सांगितले. मात्र विचार विनिमय केल्यावर मोदींनी हा राजीनामा फेटाळून लावल्याची चर्चा रंगली आहे. या बैठकीत पक्ष नेत्यांनी आगामी रणनिती काय असेल, स्वराज यांची पाठराखण कशी करायची यावर चर्चा झाली. रविवारी भारतातील प्रसारमाध्यमांमध्ये वृत्त झळकताच भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी स्वराज यांची पाठराखण केली. या वृत्तावर भाजपा, सुषमा स्वराज यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

Web Title: Sushma Swaraj resigned?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.