शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
3
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
4
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
5
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
7
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
8
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
9
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
10
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
11
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
12
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
13
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
14
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
15
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
17
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
18
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
19
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
20
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी

एका ट्विटवर समस्या सोडवणाऱ्या, मदतीसाठी तत्पर असणाऱ्या सुषमा स्वराज यांची जयंती; नेटकऱ्यांकडून आदरांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2021 9:40 AM

Sushma Swaraj Birth Anniversary: परराष्ट्र मंत्रालय लोकाभिमुख करणाऱ्या, ट्विटद्वारे साद घालणाऱ्या प्रत्येकास मदत करणाऱ्या सुषमा स्वराज यांची आज जयंती आहे.

नवी दिल्ली: परराष्ट्र मंत्रालयासारखं महत्त्वाचं खातं लोकाभिमुख करणाऱ्या नेत्या सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांची आज जयंती आहे. परराष्ट्र मंत्रालयाचा पदभार असताना स्वराज अवघ्या एका ट्विटच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या भारतीयांना मोलाची मदत केली. तुम्ही जगात कुठेही असा, तुमचा देश तुमच्या मदतीसाठी तत्पर आहे, अशी भावना स्वराज यांनी परदेशात असलेल्या भारतीयांच्या मनात निर्माण केली. याशिवाय देशातील नागरिकांनादेखील त्यांनी वेळोवेळी मोलाची मदत केली. स्वराज यांच्या असंख्य आठवणींना आज अनेकांनी उजाळा दिला आहे.सुषमा स्वराज यांची मुलगी बासुरीनं एका केकचा फोटो शेअर करून आईबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'आई, आता केक फिका वाटतो. स्नेह आणि करुणा यांचं मानवीय रुप म्हणजे सुषमा स्वराज. आज आपण कोणाला तरी मदत करू आणि आईचा वाढदिवस साजरा करू,' असं बासुरीनं ट्विटमध्ये म्हटलं आहे. बासुरीच्या ट्विटर कमेंट करून अनेकांनी सुषमा स्वराज यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.सर्वात कमी वयात कॅबिनेट मंत्रीझुंजार आणि तडफदार नेत्या म्हणून सुषमा स्वराज कायम स्मरणात राहतील. 1977 मध्ये वयाच्या 25व्या वर्षी सुषमा स्वराज हरियाणाच्या कामगार मंत्री झाल्या होत्या. सर्वात कमी वयाच्या कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांची नोंद झाली. १९७७ ते १९७९ दरम्यान समाजकल्याण, कामगार यासारख्या आठ खात्यांची जबाबदारी त्यांनी सक्षमपणे सांभाळली. त्यानंतर वयाच्या २७ व्या वर्षी त्या जनता पार्टीच्या हरियाणा प्रदेशाध्यक्ष झाल्या.पहिल्या महिला मुख्यमंत्री, पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्याराष्ट्रीय स्तरावरील राजकीय पक्षाच्या पहिल्या महिला प्रवक्त्या म्हणूनही सुषमा स्वराज स्मरणात राहतील. त्याशिवाय, पहिल्या महिला मुख्यमंत्री आणि पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या म्हणूनही स्वराज यांच्या नावाची नोंद देशाच्या राजकीय इतिहासात आहे. देशाच्या परराष्ट्र मंत्री म्हणून इंदिरा गांधी यांनी सर्वप्रथम जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर हे जबाबदारीचं पद भूषवणाऱ्या सुषमा स्वराज दुसऱ्या महिला नेत्या होत्या.तीनदा आमदार, सातवेळा खासदारचार दशकांच्या राजकीय कारकिर्दीत त्या एकूण ११ निवडणुका जिंकल्या. त्या तीन वेळा विधानसभेवर निवडून गेल्या होत्या, तर सात वेळा खासदार म्हणून विजयी झाल्या होत्या. २००० मध्ये सुषमा स्वराज या राज्यसभेवर निवडून गेल्या आणि अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये त्या पुन्हा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या मंत्री बनल्या. त्याचदरम्यान राष्ट्रीय राजकारणात आणि भाजपामध्ये त्यांचा प्रभाव प्रचंड वाढला.सुषमा स्वराज जगाच्या पाठीवर कोणत्याही भारतीयाला एका ट्विटद्वारे पोहोचवायच्या मदत, 10 महत्त्वाची उदाहरणंभाजपच्या दुसऱ्या पिढीतील वजनदार नेत्या2009मध्ये त्यांना भाजपाकडून पंतप्रधानपदाच्या प्रबळ दावेदार मानलं जाऊ लागलं. परंतु निवडणुकीत पुन्हा काँग्रेसचं सरकार सत्तेवर आलं आणि सुषमा स्वराज यांना विरोधी पक्षनेतेपद मिळालं. नेतृत्व क्षमतेच्या जोरावर सुषमा स्वराज यांच्याकडे भाजपाच्या दुसऱ्या पिढीतील सर्वात वजनदार नेत्या म्हणून पाहिलं जात होतं. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी विदिशातून विजय मिळवला होता. सुषमा स्वराज यांची पत आणि भाजपासाठी दिलेलं योगदान लक्षात घेता मोदींनी त्यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयासारखं महत्त्वाचं खातं सोपवलं.वक्तृत्व.. नेतृत्व.. कर्तृत्वाचा मिलाफ म्हणजे सुषमा स्वराज!परराष्ट्र मंत्री म्हणून शानदार कामगिरीमोदी सरकार-१ दरम्यान परराष्ट्र मंत्री म्हणून सुषमा स्वराज यांनी केलेल्या कामाला तर तोड नव्हती. ट्विटरवरून साद घालणाऱ्या प्रत्येकाला सुषमांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. छोट्या छोट्या गोष्टींपासून ते कुलभूषण जाधव आणि गीताच्या सुटकेसाठी मनापासून प्रयत्न केले होते. त्यासाठी देश त्यांचा कायमच कृतज्ञ राहील. सुषमा स्वराज यांनी 2018मध्ये तब्येतीच्या कारणास्तव २०१९ची लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं. त्यानंतरही त्यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयाचं खात कायम होतं.

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराज