शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लग्न तोंडावर आले असताना हरवला पासपोर्ट, सुषमा स्वराज म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 16:52 IST

पासपोर्ट हरवण्याचा आणखी एक प्रसंग काल घडला असून त्या व्यक्तीला मदत करताना परराष्ट्रमंत्र्यांनी मजेशीर उत्तर दिले आहे.

नवी दिल्ली- पासपोर्ट हरवला, कोणी संकटात सापडलं की सरळ परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना ट्वीट करायचं आणि मोकळं व्हायचं असा शिरस्ता झालेला आहे. परराष्ट्र खात्याकडे मदत मागण्यासाठी सुषमा स्वराज यांचे ट्वीटर हँडल हे एक हक्काचे स्थान झाले आहे. स्वराज परराष्ट्रमंत्रीपदी आल्यापासून देशातील आणि परदेशातील अनेक लोकांनी त्यांची ट्वीटरवर मदत मागितली आहे. स्वराज यांनीही त्या लोकांना मदत केल्याची अनेक उदाहरणे आहेत.

पासपोर्ट हरवण्याचा आणखी एक प्रसंग काल घडला असून त्या व्यक्तीला मदत करताना परराष्ट्रमंत्र्यांनी मजेशीर उत्तर दिले आहे. देवता रवी राजा नावाच्या एका व्यक्तीने काल ट्वीट करत आपला विवाह 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान असून आपण 10 ऑगस्टरोजी प्रवासाला निघणार आहोत असे सांगितले. मात्र आपला पासपोर्ट हरवला आहे, आता तुम्ही एकमेव आशास्थान आहात असे त्याने कळवले. सुषमा स्वराज यांनी या ट्वीटची तात्काळ दखल घेतली आणि त्याला त्यांनी मदत करण्याचे आश्वासव तर दिलेच त्याहून मजेशिर शब्दांमध्ये त्याची फिरकीही घेतली. तुम्ही अगदीच चुकीच्या वेळेस पासपोर्ट हरवला आहे, पण आम्ही तुम्हाला विवाहास योग्य वेळेत पोहोचण्यासाठी मदत करु असे ट्वीट त्यांनी केले. व त्यामध्ये अमेरिकेतील भारतीय राजदुतावासाला टॅग करुन देवता याला मदत करण्यास सूचित केले. सुषमा स्वराज यांच्या ट्वीटला तात्काळ जगभरातून शेकडो लाईक्स आणि रिट्वीट करत लोकांनी प्रतिसाद दिला. सुषमा स्वराज यांच्या ट्वीटरवर जगभरातून मदतीसाठी लोक विनंती करत असतात. परदेशात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास शोकाकूल आप्तांना मदत करण्यासाठी सुषमा स्वराज ट्वीटरवर तात्काळ तयार असतात.

 

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराजTwitterट्विटर