शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

नितीश कुमारांच्या NDA प्रवेशाला सुशील मोदींनी सिग्नल दिला; भाजपची रणनीतीही सांगितली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 16:04 IST

देशात काही दिवसातच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत.

Political News ( Marathi News ) : देशात काही दिवसातच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. सर्व पक्षांनी या निवडणुकांची तयारी केली असून विरोधकांच्या इंडिया आघाडीत जागावाटपाचीही चर्चा सुरू आहे. पण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार गेल्या काही दिवसापासून इंडिया आघाडीपासून अंतर ठेवून आहेत, आता नितीश कुमार एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. दरम्यान, आता  भाजप खासदार सुशील कुमार मोदी यांच्या विधानाने पुन्हा राजकीय वर्तुळात या चर्चा सुरू आहेत. 

खासदार सुशील कुमार मोदी म्हणाले,  जर केंद्रीय नेतृत्वाला नितीश कुमार यांनी एनडीएमध्ये प्रवेश करावा असं वाटत असेल तर राज्य युनिट हा निर्णय मान्य करेल. यासोबतच सुशील मोदींनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेपोटिझमबाबत केलेल्या वक्तव्याचे कौतुक केले आहे.

अयोध्येत दुमदुमला महाराष्ट्राचा आवाज...; पाहा, ढोल-ताशांचा हा मंत्रमुग्ध करणारा व्हिडीओ!

सुशील कुमार मोदी म्हणाले की, नितीश कुमार यांनी पहिल्यांदाच कुटुंबवादावर योग्य बोलले आहेत. परिवारवादाला विरोध हे भाजपचे धोरण आहे आणि मुख्यमंत्री नितीश कुमारही त्याच विचारसरणीचे आहेत. कर्पुरी जयंतीच्या रॅलीत आपल्या भाषणात मुख्यमंत्री नितीश यांनी परिवारवादावर निशाणा साधला होता. यामुळे अप्रत्यक्षपणे लालू कुटुंब आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. हे भाजपचे धोरण आहे आणि पंतप्रधान मोदी हे त्याचे सर्वात मोठे विरोधक आहेत, असंही सुशील मोदी म्हणाले. 

सुशील मोदी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानणे त्यांची राजकीय नैतिकता दर्शवते. हे आभार मानायला हवे होते आणि राजकारणात हे व्हायला हवे होते.

लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकारणात मोठी घडामोड

याआधी केंद्रीय मंत्री पशुपती कुमार पारस यांनीही मोठं वक्तव्य केलं होतं आणि बिहारमध्ये ३१ जानेवारीपर्यंत काहीतरी मोठं घडू शकतं. त्यांचा संदर्भ आघाडीतील सत्ताबदलाकडे होता. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, बिहारमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की नितीश कुमार यांना एनडीएचा भाग व्हायचे असेल तर एनडीए आघाडीतील मित्रपक्षांचा त्याला आक्षेप नाही.यामुळे आता लोकसभा निवडणुकीपूर्वी बिहारच्या राजकारणात मोठी घडामोड घडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपा