फीला चॅम्पियनशिपमधून सुशील, योगेश्वरची माघार
By Admin | Updated: August 10, 2014 02:07 IST2014-08-10T02:07:48+5:302014-08-10T02:07:48+5:30
सुशील कुमार, योगेश्वर दत्त, अमित कुमार दहिया आणि बबिता कुमार यांनी पुढील महिन्यात उझबेकिस्तानमध्ये होणा:या फीला जागतिक कुस्ती चॅम्पिशनशिपमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे;

फीला चॅम्पियनशिपमधून सुशील, योगेश्वरची माघार
>नवी दिल्ली : भारताचा अनुभवी मल्ल सुशील कुमार, योगेश्वर दत्त, अमित कुमार दहिया आणि बबिता कुमार यांनी पुढील महिन्यात उझबेकिस्तानमध्ये होणा:या फीला जागतिक कुस्ती चॅम्पिशनशिपमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र हे सर्व मल्ल 27 सप्टेंबरपासून सुरू होणा:या आशियाई स्पर्धेत खेळणार आहेत़
सुशील आणि योगेश्वर यांनी नुकत्याच झालेल्या ग्लास्गोमधील राष्ट्रकुल स्पर्धेत अनुक्रमे 74 आणि 65 किलो वजन गटात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते; त्यामुळे उत्साहाचे वातावरण होते. मात्र हे दोन्ही स्टार मल्ल 4 ते 18 सप्टेंबर होणा:या जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत खेळणार नसल्याचे समजते.
भारताचा अमित कुमार दहिया (57 किलो वजन गट) आणि बबिता कुमारही (55 किलो) जागतिक कुस्तीत सहभाग घेणार नाही़त या दोन्ही खेळाडूंनी राष्ट्रकुल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरले होत़े
यासंदर्भात कुस्ती संघाचे मुख्य प्रशिक्षक विनोद कुमार यांनी सांगितले की, आशियाई स्पर्धेसाठी मल्ल तंदुरुस्त राहणो गरजेचे आहे, तसेच दुखापतीपासून बचावही तेवढाच महत्त्वाचा आह़े त्यामुळे सुशील, योगेश्वर, अमित आणि बबिता जागतिक कुस्ती स्पर्धेत सहभाग घेणार नाही़ आता आम्ही जागतिक कुस्ती स्पर्धेत ‘ब’ संघ पाठविण्याचा निर्णय घेतला आह़े
कुस्ती कॅलेंडरमध्ये जागतिक कुस्ती स्पर्धेला विशेष महत्त्व आहे; मात्र यापेक्षाही आमच्यासाठी आशियाई स्पर्धा महत्त्वाची आह़े कारण भारतीय पहिलवानांनी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्यास याचा परिणाम भारताच्या पदक तालिकेत पडतो़ तसेच देशाचेही नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकते. म्हणूनच आम्हाला आशियाई आणि जागतिक कुस्ती यापैकी एका स्पर्धेची निवड करायची होती़ त्याचा निर्णय मल्लांवर सोडला होता. त्यापैकी मल्लांनी आशियाई स्पर्धेची निवड केली, असेही विनोद कुमार यांनी सांगितल़े (वृत्तसंस्था)