शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Survey on Cabinet reshuffle: नवे मंत्री आल्याने कामात सुधारणा होईल, अशी फक्त 4% लोकांना आशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 11:10 IST

Survey on Cabinet reshuffle: लोकल सर्कल या वेबसाइटने हा सर्व्हे केला आहे

ठळक मुद्देसर्व्हेत 309 जिल्ह्यात राहणाऱ्या नागरिकांकडून 9,618 प्रतिक्रीया मिळाल्या5 टक्के लोकांनी चांगले प्रशासन संभव नसल्याचे म्हटले

नवी दिल्ली : काल म्हणजेच 7 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदीसरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. त्यापूर्वी, मंत्रिमंडळातून आरोग्य मंत्री, शिक्षण मंत्री, सूचना आणि प्रसारण मंत्र्यांसह 12 मंत्र्यांना डच्चू देण्यात आला. तर, 36 नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली. दरम्यान, या मंत्रिमंडळ विस्तारावर लोकल सर्कल या वेबसाइटने एक सर्व्हे केला आहे. त्या सर्व्हेनुसार, मंत्रिमंडळ विस्तारामुळे कामात सुधारणा होईल, अशी फक्त 4 लोकांना आशा आहे.

सर्व्हेत काय विचारण्यात आले ?

लोकल सर्कलने सांगितल्यानुसार, सर्वेक्षणादरम्यान देशातील 309 जिल्ह्यात राहणाऱ्या नागरिकांकडून 9,618 प्रतिक्रिया मिळाल्या. यात 68 टक्के पुरुष आणि 32 महिला होत्या. सर्वेक्षण लोकलसर्कल प्लॅटफॉर्मवरुन करण्यात आले. सर्वेक्षणानुसार 53 टक्के लोकांना वाटतं की, प्रशासनात सुधारणा आणण्यासाठी, उद्देश ठरवणे आणि मंत्र्यांची कामगिरी मोजण्यासाठी एका मजबूत यंत्रणेची आवश्यकता आहे. सर्व्हेत विचारले की, 'मोदी सरकारला प्रशासनात सुधारणा करणे आणि निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची गरज आहे ?''

या प्रश्नावर 2 टक्के लोक म्हणाले- जास्त मंत्री असल्यामुळे कामात सुधारणा होईल. 2 टक्के म्हणाले- नोकरशाही असल्याने अधिक चांगले प्रशासन मिळेल. 2 टक्के म्हणाले- मंत्री आणि नोकरशाही असल्यास चांगले प्रशासन मिळेल. 12 टक्के म्हणाले- खासगी क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्याची गरज. 19 टक्के लोकांचे मानने आहे की, चांगल्या प्रशासनासाठी सरकारला अजून चांगले निर्णय घ्यावे लागतील. 5 टक्के लोकांनी आपले मत मांडले नाही तर 5 टक्के लोकांनी चांगले प्रशासन संभव नसल्याचे म्हटले. याशिवाय, 53 टक्के लोकांनी प्रशासनात सुधारणा आणण्यासाठी स्पष्ट उद्देश ठरवणे आणि मंत्र्यांच्या कामाचे मोजमाप करण्यासाठी एका मजबूत यंत्रणेची गरज असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाGovernmentसरकार