शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आश्चर्य ! 9 गोळ्या लागूनही मृत्यूच्या दाढेतून परतलेले सीआरपीएफ कमांडंट चेतन चिता कामावर रुजू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2018 08:49 IST

दहशतवाद्यांशी लढताना अंगावर 9 गोळ्या झेलूनही मृत्यूच्या दाढेतून परतलेले सीआरपीएफ कमांडंट चेतन चिता हे पुन्हा कामावर रुजू झाले आहेत.

नवी दिल्ली- दहशतवाद्यांशी लढताना अंगावर 9 गोळ्या झेलूनही मृत्यूच्या दाढेतून परतलेले सीआरपीएफ कमांडंट चेतन चिता हे पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. दहशतवाद्यांच्या 9 गोळ्या लागूनही कामावर पुन्हा रूजू होणं हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत त्यांना 9 गोळ्या लागल्या होत्या.केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या (सीआरपीएफ) चेतन चीता या कमांडिंग ऑफिसरना कीर्तिचक्र पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं होतं. काश्मीरच्याच हाजिन क्षेत्रात गेल्या वर्षी 14 फेब्रुवारीला दहशतवाद्यांशी लढताना चेतन चिता हे गंभीररीत्या जखमी झाले होते. या कारवाईत त्यांना 9 गोळ्या लागल्या होत्या. मात्र उपचारादरम्यान ते आश्चर्यकारकरीत्या बचावले होते.काश्मीरच्या बांदीपोरामध्ये दहशतवाद्यांशी लढताना चेतन चिता जखमी झाले होते. त्यांच्या शरीरात नऊ गोळ्या घुसल्या होत्या. त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले त्यावेळी त्यांच्या डोक्यातही गोळी घुसल्याची माहिती मिळाली होती. गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे हल्ले वाढत आहेत. जम्मू-काश्मीरमधील शोपियाँ जिल्ह्यात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या चकमकीत लष्कराने एक दहशतवादी आणि त्याला मदत करणाऱ्या तिघांना कंठस्नान घातले होते. रविवारी रात्री लष्कराच्या गस्तीपथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यावेळी लष्करानेही प्रत्युत्तरदाखल गोळीबार केला होता. यामध्ये एक दहशतवादी ठार झाला होता. तसेच घटनास्थळावरून तीन अन्य मृतदेहसुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे. हे मृतदेह दहशतवाद्याला मदत करणाऱ्यांचे असल्याचे लष्कराने सांगितले आहे. मात्र स्थानिकांनी हे मृतदेह सर्वसामान्य नागरिकांचे असल्याचा दावा केला होता.  

टॅग्स :TerrorismदहशतवादJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवान