शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा करणार सर्जिकल स्ट्राईक? लष्करप्रमुख बिपिन रावत म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 08:57 IST

पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची गरज लष्करप्रमुखांनी व्यक्त केली

नवी दिल्ली: गेल्याच आठवड्यात जम्मू-काश्मीरमध्ये तीन पोलिसांची दहशतवाद्यांनी निर्घृण हत्या केली. या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे भारतीय सुरक्षा दलांच्या हाती  लागले आहेत. यानंतर भारताचे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याची गरज व्यक्त केली. यावेळी लष्करप्रमुखांना भारतीय सैन्याकडून पुन्हा सर्जिकल स्ट्राईक केला जाणार का?, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर सर्जिकल स्ट्राईकचा वापर सरप्राईज म्हणून केला जातो. त्यामुळे सर्जिकल स्ट्राईक सरप्राईज म्हणूनच राहू द्या, असं उत्तर रावत यांनी दिलं. संयुक्त राष्ट्राच्या महासभेदरम्यान भारत-पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होणार होती. मात्र या बैठकीआधी जम्मू-काश्मीरमध्ये तीन पोलिसांची दहशतवाद्यांनी निर्घृणपणे हत्या केली. या हत्यांचे आदेश सीमेपलीकडून देण्यात आल्याचे पुरावे भारतीय सुरक्षा दलांच्या हाती लागले. त्यामुळे मोदी सरकारनं न्यूयॉर्कमध्ये होऊ घातलेली पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचं लष्करप्रमुखांनी समर्थन केलं. 'शांततेसाठीची चर्चा आणि दहशतवादी कारवाया एकाचवेळी होऊ शकत नाही. सरकारनं चर्चा रद्द करुन अगदी योग्य निर्णय घेतला आहे. आम्ही दहशतवादाला पायबंद घालू इच्छितो, हे दाखवणारी एखादी ठोस कृती पाकिस्ताननं करुन दाखवावी,' असं रावत यांनी म्हटलं.जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या दहशतवादी कारवायांचं मूळ नेमकं कुठे आहे, यावर बोलताना लष्करप्रमुखांनी नाव न घेता पाकिस्तानच्या दिशेनं इशारा केला. 'आम्ही आमच्या देशाच्या सीमेचा वापर शेजारी देशांमध्ये दहशतवाद पसरावा यासाठी करत नाही, असं ते वारंवार म्हणतात. मात्र दहशतवादी कारवाया कुठून सुरू आहेत, हे आपण पाहतच आहोत. दहशतवादी सीमेपलीकडूनच जम्मू-काश्मीरमध्ये येतात, हे आपण वारंवार पाहिलं आहे,' असं रावत यांनी म्हटलं. पाकिस्तानला त्यांच्याच शब्दात उत्तर द्यायला हवं, असंदेखील ते म्हणाले.  

टॅग्स :surgical strikeसर्जिकल स्ट्राइकBipin Rawatबिपीन रावतIndian Armyभारतीय जवानTerrorismदहशतवादterroristदहशतवादीPakistanपाकिस्तान