गरज पडल्यास पाकिस्तानवर पुन्हा करणार सर्जिकल स्ट्राईक
By Admin | Updated: January 3, 2017 20:36 IST2017-01-03T20:36:13+5:302017-01-03T20:36:13+5:30
भारताचे नवनियुक्त लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी पाकिस्तान संबंधी महत्वपूर्ण विधान केले आहे. पाकिस्तान विरुद्ध सर्जिक स्ट्राईक्सची शक्यता

गरज पडल्यास पाकिस्तानवर पुन्हा करणार सर्जिकल स्ट्राईक
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3 - भारताचे नवनियुक्त लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी पाकिस्तान संबंधी महत्वपूर्ण विधान केले आहे. पाकिस्तान विरुद्ध सर्जिक स्ट्राईक्सची शक्यता नाकारता येणार नाही. सर्जिकल स्ट्राईक्सचा उद्देश संदेश देण्याचा असतो असे बिपिन रावत यांनी एनडीटीव्ही वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
सीमेवर शांतता ठेवणे ही सैन्याची जबाबदारी आहे. पण गरज पडल्यास धाडसी कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही असा इशाराच नवनियुक्त लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी दिला आहे. रावत यांनी शनिवारी भारताचे 27 वे लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.
सेवा ज्येष्ठतेमध्ये लेफ्टनट जनरल प्रवीण बक्षी आणि पीएम हॅरीझ यांना डावलून बिपिन रावत यांना लष्करप्रमुखपदी बढती देण्यात आली आहे. बक्षी यांनी नव्या लष्करप्रमुखांना आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. सध्या शेजारी राष्ट्रांनी देशासमोर निर्माण केलेली आव्हाने लक्षात घेता बिपिन रावतच या पदासाठी योग्य असल्याने सरकारने त्यांची निवड केली अशी सूत्रांनी माहिती दिली.