सुरगाण्यात मोहन भागवत यांचे आज आगमन
By Admin | Updated: March 24, 2016 23:30 IST2016-03-24T22:37:04+5:302016-03-24T23:30:56+5:30
सुरगाणा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे आज (दि.२५) सुरगाण्यात विवाह समारंभासाठी येत असल्याने त्यांच्या आगमनाची मोठी उत्सुकता वर - वधू च्या कुटूंबासह तालुक्यातील आर एस एस च्या पदाधिकारी व कार्यकयांना लागून राहिली आहे.

सुरगाण्यात मोहन भागवत यांचे आज आगमन
सुरगाणा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे आज (दि.२५) सुरगाण्यात विवाह समारंभासाठी येत असल्याने त्यांच्या आगमनाची मोठी उत्सुकता वर - वधू च्या कुटूंबासह तालुक्यातील आर एस एस च्या पदाधिकारी व कार्यकयांना लागून राहिली आहे.
या दूर्गम आदिवासी तालुक्यात येण्याचे कारण म्हणजे त्यांचा अतिशय जवळचा व आचारी असलेला कार्यकर्ता देविदास यशवंत कामडी हा सुरगाणा तालुक्यातील मोठी घोडी या गावचा रहिवासी असून या देविदासचा विवाह तालुक्यातील तोरणडोंगरी येथील मालती गावित हिचेशी आज (दि.२५) रोजी दुपारी संपन्न होणार आहे. देविदासच्या आग्रहाच्या निमंत्रणामुळे सरसंघचालक वधू - वरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी या विवाहास उपस्थित राहणार आहेत. प्रथम ते प्रतापगड येथे सकाळी काही वेळ थांबून संघाच्या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर ते तोरणडोंगरी येथे विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी रवाना होणार असल्याचे समजते. आर.एस.एस.चे एखादे प्रमुख तेही विवाह समारंभासाठी तालुक्यात येण्याची हि बहुधा पिहलीच वेळ असावी. त्यामुळे आर.एस.एस. चे कार्यकर्ते तसेच पोलिस प्रशासन देखील सजग झाले आहेत. (वार्ताहर)