शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

काल शपथ अन् आता मंत्रिपद सोडण्याची इच्छा? सुरेश गोपी यांनी स्वतः केला खुलासा, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 16:52 IST

केरळमधील भाजपाचे एकमेव खासदार सुरेश गोपी मंत्रिपद सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Suresh Gopi News : काल, म्हणजेच 9 जून रोजी मोदी सरकारचा शपथविधी सोहला पार पडला. पंतप्रधान मोदींसह 69 खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावत केरळमधील भाजपाचे एकमेव खासदार सुरेश गोपी (Suresh Gopi) यांनीदेखील केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, शपथविधीनंतर अचानक सुरेश गोपी मंत्रिपद सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली. विविध वृत्त वाहिन्यांमध्येही ही बातमी आली. आता त्यांनी या सर्व वृत्तांचे खंडन केले आहे.     

सुरेश गोपी काय म्हणाले?यंदाच्या लोकसभा निवडणूकीत पहिल्यांदाच केरळमध्ये कमळ फुलले. भाजप नेते सुरेश गोपी यांनी त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून मोठा विजय मिळवला. या विजयानंतर त्यांची मंत्रिपदी वर्णी लागली. काल त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, पण त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याच्या बातम्या समोर आल्या. मात्र आता त्यांनी अशा सर्व बातम्यांचे खंडन केले आहे. त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले की, "काही मीडिया प्लॅटफॉर्म चुकीच्या बातम्या पसरवत आहेत की, मी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देत आहे. हे पूर्णपणे चुकीचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत. केरळच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी वचनबद्ध आहे," असे त्यांनी सांगितले.

सुरेश गोपी यांच्याबाबत काय दावा केला जात होता? सुरेश गोपी यांना मंत्रिपद नकोय, त्यांना खासदार राहून त्रिशूरच्या लोकांसाठी काम करायचे आहे, असे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुरेश गोपी म्हणाले की, "खासदार म्हणून काम करण्याचं माझं ध्येय आहे. मी काहीही मागितलेलं नाही, मी म्हणालो होतो की, मला या पदाची गरज नाही. मला वाटतं की मला लवकरच पदावरून मुक्त केलं जाईल. त्रिशूरच्या मतदारांना कोणतीही अडचण नाही. त्यांना हे माहीत आहे आणि खासदार म्हणून मी त्यांच्यासाठी खरोखर चांगले काम करेन. तसेच, मी काही चित्रपट साईन केले आहेत, ते मला कोणत्याही किंमतीत करायचे आहेत," असे सुरेश गोपी यांनी सांगितल्याचा दावा केला जात होता. पण, आता त्यांनी स्वतः हे सर्व दावे खोडून काढले आहेत.

टॅग्स :BJPभाजपाlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालCentral Governmentकेंद्र सरकारkerala Lok Sabha Election 2024केरळ लोकसभा निवडणूक 2024