शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

सुरतेचा खजिना लुटला जाणार?, महाराष्ट्राच्या राजकारणावरही पडणार प्रभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 3:13 AM

दक्षिण गुजरातमधील मतदारांचे लक्ष सुरतमधील निवडणुकांकडे लागले आहे. पाटीदार आंदोलन व कपडा व्यापा-यांची नाराजी येथील भाजपाच्या किती जागा खराब करते त्यावर

संदीप प्रधानआणंद : दक्षिण गुजरातमधील मतदारांचे लक्ष सुरतमधील निवडणुकांकडे लागले आहे. पाटीदार आंदोलन व कपडा व्यापा-यांची नाराजी येथील भाजपाच्या किती जागा खराब करते त्यावर भाजपाला काठावरील बहुतम मिळेल की भक्कम, ते ठरणार आहे. दक्षिण गुजरातचे महाराष्ट्राशी जवळचे नाते आहे. सुरत, बडोद्यात बरेच मराठी भाषिक आहेत. त्यामुळे दक्षिण गुजरातचे निकाल महाराष्ट्राच्या राजकारणावरही प्रभाव पाडणारे असतील.सुरतमध्ये चार जागांवर पाटीदार आणि चार जागांवर कपडा व्यापाºयांचा इफेक्ट दिसू शकतो. मागील वेळी सुरतमधील सर्वच्या सर्व १२ जागा भाजपाने जिंकल्या होत्या. या वेळी सुरत, बडोदा परिसरात भाजपाला यदाकदाचित फटका बसला तर महाराष्ट्रात शिवसेना आक्रमकहोईल. भाजपाला रोखण्यासाठी शिवसेनेने याच भागात उमेदवार उभे केले आहेत.डागाळलेले, तरीही लोकप्रियराजकारणाचे गुन्हेगारीकरण हा मुद्दाही दक्षिण गुजरातमध्ये काही प्रमाणात जाणवतो. सर्वच पक्षांनी डागळलेल्या प्रतिमेच्या, दहशत निर्माण करणाºया उमेदवारांना थोड्या-अधिक प्रमाणात संधी दिली आहे. उमेदवार गुंड, भ्रष्ट,दहशत निर्माण करणारा असला तरी लोकांची कामे करीत असल्याने लोकप्रिय आहे हा राजकारणात नव्याने प्रबळ होत असलेला प्रवाह दक्षिण गुजरातमध्ये पाहायला मिळाला.पटेल जवळ आल्यानेओबीसी, दलित दूर ?आदिवासी व ग्रामीण भागात काँग्रेसचा आजही जोर कायम आहे. मात्र पाटीदार समाजाला खूप जवळ करण्यामुळे ओबीसी, दलित, आदिवासी नाराज होऊ शकतात. गुजरातमध्ये ओबीसींची संख्या लक्षणीय असून, पाटीदार व ओबीसी यांच्यात संघर्ष आहे. महाराष्ट्रात मराठाकेंद्रित राजकारण केल्यामुळे ओबीसी नाराज होऊन त्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला मागील विधानसभा निवडणुकीत बसला होता.बंडोबा भाजपामध्येहीबंडखोरी हेही सर्वच पक्षांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. भाजपासारख्या संघ शिस्तीच्या पक्षातही गल्लोगल्ली बंडोबा उदयाला आले आहेत. भडोचमधील जंबुसर, बडोद्यातील अकोटा, शहरवाडी, वाघोडिया, गोध्रा, कलोल आदी मतदारसंघांत भाजपाला बंडखोरीच्या डोकेदुखीचा सामना करावा लागत आहे.''काँग्रेसचे नेते शेजारील राज्यातील हा ताजा इतिहास दुर्लक्षित करणार नाहीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहेत. दक्षिण गुजरातमधील धरमपूरजवळील चाकमांडवा येथे धरणाला, उंबरगावमध्ये बंदर उभारणीला तर भडोचजवळील बारबुतला समुद्रात रस्ता उभारणीला विरोध आहे.गुजरातमध्ये २२ वर्षे भाजपाचे बहुमतातील सरकार आहे. तरीही प्रकल्पांना विरोध आहे. महाराष्ट्रात आघाडी-युतीचे सरकार असल्याने प्रकल्प पूर्ण होत नाही, अशी तक्रार सत्ताधारी करतात. मात्र पुनर्वसन व प्रकल्पाच्या लाभांबाबत सर्वत्रच लोकांच्या मनात शंका आहे. एकूणच राजकीय नेते हे बेभरवशाचे असल्याचीही भावना येथे दिसून येते.

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017