शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! राहुल गांधींना सुरतच्या सत्र न्यायालयातून जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 16:00 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत सत्रन्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत सत्रन्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.  आज राहुल गांधी स्वत: सुरत येथील सत्र न्यायालयात उपस्थित होते. मानहानीच्या खटल्यातील शिक्षेला आव्हान देण्यासाठी ते आले होते. या प्रकरणी त्यांनी शिक्षा सुनावल्यानंतर ११ दिवसांनी त्यांनी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली. दरम्यान त्यांनी आज कोर्टात नियमित जामिनासाठी अर्जही दाखल केला होता.

राहुल गांधी आणि प्रियांका गांधीही सुरतमध्ये उपस्थिती होते.  काँग्रेसचे अनेक दिग्गज नेतेही त्यांच्यासोबत सुरतमध्ये उपस्थित होते.

जगातील सर्वात लोकप्रिय नेते बनले पंतप्रधान मोदी, अमेरिकेच्या बायडन यांनाही खूप मागे टाकलं!

मानहानीच्या खटल्यात कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेविरोधात राहुल गांधी यांनी अपील दाखल केले होते. या अर्जावर त्यांना १३ एप्रिलपर्यंत जामीन मिळाला आहे. त्याचबरोबर या प्रकरणी पुढील सुनावणीची तारीख ३ मे निश्चित करण्यात आली आहे. यासोबतच न्यायालयाने राहुल गांधींना नियमित जामीनही मंजूर केला आहे. राहुल गांधींच्या वतीने त्यांच्या वकिलांनी सुरत न्यायालयात कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारा अर्ज दाखल केला होता. दुपारी तीनच्या सुमारास राहुल गांधी न्यायालयात हजर झाले. यावेळी त्यांच्यासोबत वकिलांच्या टीमसह तीन राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते. राहुल गांधींसोबत प्रियांका गांधीही सुरतमध्ये आल्या होत्या. आणि काँग्रेस नेत्यांना न्यायालयाबाहेरच रोखण्यात आले. दुसरीकडे, न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर राहुल गांधी आजच दिल्लीत परतत आहेत.

२०१९ मध्ये राहुल गांधींनी केलेल्या  'मोदी आडनाव'च्या विधानासाठी न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. याला अपील करण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली होती. आदेशानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती न दिल्यास त्यांना आठ वर्षे निवडणूक लढवता येणार नाही. सुरतच्या सीजेएम न्यायालयाच्या निर्णयाला राहुल गांधी यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. राहुल गांधींच्या वतीने अपील दाखल करण्यापूर्वी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सुरतमध्ये पत्रकार परिषद घेतली. यामध्ये गेहलोत यांनी भाजपवर केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप केला. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस