शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

‘स्टाफ सिलेक्शन’चा निकाल जाहीर करण्यास सुप्रीम कोर्टाची स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2018 7:23 AM

प्रक्रिया सदोष असल्याचा ठेवला ठपका

नवी दिल्ली : सरकारी कार्यालये व मंत्रालयांतील कर्मचारी भरतीसाठी कर्मचारी निवड आयोगाने (एसएससी) २०१७ मध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती दिली. ही परीक्षा प्रक्रिया सदोष असल्याचे प्रथमदर्शनी दिसते, असे न्यायालयाने स्थगिती देताना म्हटले आहे.

२०१७ मधील या सदोष कर्मचारी निवड आयोगाच्या एकत्रित पदवी स्तर व वरिष्ठ दुय्यम स्तर परीक्षेचा लाभ लोकांना होऊन त्यांनी सेवेत येण्यास आम्ही परवानगी देऊ शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले. वेगवेगळे सरकारी विभाग आणि मंत्रालयांत कर्मचारी भरती करण्यासाठी एसएससी अनेक पातळ््यांवर परीक्षांचे आयोजन करणारी संस्था आहे. न्या. शरद बोबडे आणि न्या. एल. नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने केंद्रीय गुप्तचर खात्याच्या (सीबीआय) अहवालाचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास स्थगिती दिली. अनेक एसएससी अधिकारी आणि परीक्षा प्रश्नपत्रिकेची काळजी (कस्टोडियन) घेणाऱ्यावर या अहवालात ताशेरे ओढण्यात आले. प्रथमदर्शनी दिसते ते असे की, संपूर्ण एसएससी व्यवस्था ही दूषित आणि संपूर्ण परीक्षा (२०१७) ही कलंकित आहे. कस्टोडियनच परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडतो (लिकिंग) यावर विश्वास ठेवता येऊ शकत नाही, असे खंडपीठाने म्हटले आहे.वकिलास फटकारलेसीबीआयची बाजू मांडणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल विक्रमजीत बॅनर्जी यांनी एसएससीच्या अधिकाºयांचे समर्थन करणारी भूमिका घेतल्याबद्दल खंडपीठाने त्यांना फटकारले. श्रीमान सॉलिसिटर, तुम्ही जी भूमिका घेत आहात ती आश्चर्यकारक आहे. तुम्ही सीबीआयची बाजू मांडत असून परीक्षा तर रद्दच झाल्या पाहिजेत, असे तुम्ही म्हणायला हवे. तुमच्या अहवालात अनेक अधिकाºयांचा संबंध दाखवला आहे आणि तुम्ही वेगळीच भूमिका घेत आहात, असे खंडपीठाने म्हटले.

टॅग्स :SSC Results 2018दहावी निकाल २०१८examपरीक्षाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय