शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

3.5 लाख कंत्राटी शिक्षकांना सुप्रीम कोर्टाचा झटका, हायकोर्टाचा निर्णय बदलला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 13:47 IST

सर्वोच्च न्यायालयानं शुक्रवारी 3.5 लाख कंत्राटी शिक्षकांना जोरदार धक्का दिला आहे.

नवी दिल्लीः सर्वोच्च न्यायालयानं शुक्रवारी 3.5 लाख कंत्राटी शिक्षकांना जोरदार धक्का दिला आहे. बिहारमध्ये जवळपास 3.5 लाख कंत्राटी शिक्षकांना इतर शिक्षकांप्रमाणे समान वेतन मिळणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं बिहार सरकारचं अपील मंजूर करत पाटणा उच्च न्यायालयाचा निर्णय बदलला आहे. पाटणा उच्च न्यायालयानं समान कामासाठी समान वेतन देण्याचं आंदोलक शिक्षकांच्या बाजूनं निर्णय दिला होता. त्यानंतर बिहार सरकारनं सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाविरोधात अपील केलं होतं. त्यात सर्वोच्च न्यायालयानं बिहार सरकारच्या बाजूनं निर्णय दिला आहे.बिहारमधल्या कंत्राटी शिक्षकांचे अनेक नेते दिल्लीत आहेत. शिक्षकांच्या या मुद्द्यावर न्यायमूर्ती अभय मनोहर सप्रे आणि न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांच्या पीठानं शेवटची सुनावणी गेल्या वर्षी 3 ऑक्टोबरला केली होती. त्यानंतर निर्णय राखून ठेवण्यात आला होता. सात महिन्यांनंतर आलेल्या या निर्णयाचा प्रभाव सरळ सरळ बिहारमधल्या पावणे चार लाख शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबावर होणार आहे. बिहारमध्ये कंत्राटी शिक्षकांचं वेतन सध्या 22 ते 25 हजारांच्या दरम्यान आहे. जर न्यायालयाचा निर्णय शिक्षकांच्या बाजूनं लागला असता तर शिक्षकांना 35-40 हजार रुपये पगार मिळाला असता. शिक्षकांच्या बाजूनं देशातील दिग्गज वकिलांनी लढाई लढली होती.

ही लढाई 10 वर्षं जुनी आहे. 2009मध्ये बिहार माध्यमिक शिक्षक संघानं बिहारमधल्या कंत्राटी शिक्षकांना समान काम समान वेतन देण्याच्या मागणीसाठी पाटणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आठ वर्षं चाललेल्या लढाईत बिहारमधल्या पाटणा उच्च न्यायालयानं 2017मध्ये कंत्राटी शिक्षकांच्या बाजूनं निर्णय दिला होता. पाटणा उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात बिहार सरकारनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. शिक्षकांकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवीसारख्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद केला होता. त्यानंतर शेवटची सुनावणी 2018मध्ये तीन ऑक्टोबरला झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अनेक शिक्षक प्रभावित होणार आहेत.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयTeacherशिक्षक