जल्लिकट्टू कायद्याला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
By Admin | Updated: January 31, 2017 19:26 IST2017-01-31T19:26:49+5:302017-01-31T19:26:49+5:30
जल्लिकट्टू या पारंपरिक खेळाला कायदेशीर परवानगी देणाऱ्या तामिळनाडू सरकारच्या कायद्यास स्थगिती

जल्लिकट्टू कायद्याला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 31 - जल्लिकट्टू या पारंपरिक खेळाला कायदेशीर परवानगी देणाऱ्या तामिळनाडू सरकारच्या कायद्यास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला. जल्लिकट्टू या खेळावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्याने उद्भवलेल्या तीव्र प्रतिक्रियांनंतर तामिळनाडू सरकारने तातडीने पावले उचलून हा कायदा बनवला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या कायद्याला स्थगिती देण्यास नकार दिला असला तरी तामिळानाडू सरकारला सहा आठवड्यात स्पष्टिकरण देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.