शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रीम कोर्टाचा गुजरात सरकारला दणका, बिल्किस बानोला 50 लाख रुपये देण्याचे आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 14:25 IST

गुजरात दंगलीतील सामुहिक बलात्कार पीडिता बिल्किस बानोला 50 लाख देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाचे गुजरात सरकारला दिले आहेत. ही रक्कम बानो यांना नुकसान भरपाई म्हणून देण्यात येणार आहे.

नवी दिल्ली - गुजरात दंगलीतील सामुहिक बलात्कार पीडिता बिल्किस बानोला 50 लाख देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाचे गुजरात सरकारला दिले आहेत. ही रक्कम बानो यांना नुकसान भरपाई म्हणून देण्यात येणार आहे. त्याचसोबत सरकारी नियमांनुसार बिल्किस बानोला सरकारी नोकरी आणि राहण्यासाठी घर देण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत.  सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीमध्ये हा आदेश देण्यात आला आहे. 

गुजरात सरकारने बिल्किस बानो यांना नुकसान भरपाई म्हणून 5 लाख रुपये देण्याचा प्रस्ताव सुप्रीम कोर्टासमोर प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावला आहे. आज सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायाधीश दीपक गुप्ता आणि संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने नुकसान भरपाईची रक्कम दहापटीने वाढवली. 

काय आहे प्रकरण?गुजरातमध्ये गोध्रा दुर्घटनेनंतर राज्यात प्रचंड हिंसाचार उसळला. त्यात हजाराहून अधिक लोकांचे बळी गेले. अनेक लोक बेपत्ता झाले. याच काळात तीन मार्च २००२ रोजी बिल्किस बानो प्रकरण घडले. गुजरातमधील दाहोद जिल्ह्यातील नीमखेडा येथे बिल्किस बानो राहात होती. तीन मार्च 2002 मध्ये जमावाने नीमखेडा या गावात राहणाऱ्या बिल्किस बानो आणि तिच्या कुटुंबीयांवर हल्ला केला होता. यामध्ये दंगलीत बानो यांच्या कुटुंबीयातील 8 जणांची हत्या करण्यात आली होती. ज्यामध्ये चार महिला आणि चार मुलांचा समावेश होता तर 6 जण बेपत्ता होते. एवढचं नाही तर या दंगलीमध्ये बिल्किस बानोवर बलात्कारही करण्यात आला होता. त्यावेळी बानो 5 महिन्याची गर्भवती होती. 

सुप्रीम कोर्टात आज झालेल्या सुनावणीमध्ये या प्रकरणाची चुकीची चौकशी करणाऱ्या 6 पोलिस अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याचे निर्देश कोर्टाने गुजरात सरकारला दिले आहेत. या पोलिसांना बडतर्फ करण्याचे आदेश कोर्टाने दिलेत. 21 जानेवारी 2008 मध्ये या प्रकरणामध्ये मुंबई कोर्टाने 12 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा दिली होती.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयGujarat Riots 2002गुजरात दंगल 2002