शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा TikTok वरील बंदीचा निर्णय रद्द, सुप्रीम कोर्टाचे आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 14:46 IST

टिकटॉक अ‍ॅपवरील बंदी हटविण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर 24 एप्रिलपर्यंत निर्णय घ्यावा असा आदेश सुप्रीम कोर्टाने मद्रास हायकोर्टाला दिला आहे.

नवी दिल्ली - टिकटॉक अ‍ॅपवरील बंदी हटविण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर 24 एप्रिलपर्यंत निर्णय घ्यावा असा आदेश सुप्रीम कोर्टाने मद्रास हायकोर्टाला दिला आहे. जर बुधवार 24 एप्रिलपर्यंत मद्रास हायकोर्टाने या याचिकेवर कोणताही निर्णय घेतला नाही तर हायकोर्टाने टिकटॉकवर घातलेल्या बंदीचा आदेश रद्दबातल होईल असं सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. विशेष म्हणजे मागच्या आठवडण्यात सुप्रीम कोर्टाने मद्रास हायकोर्टाने घेतलेला निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला होता. 

मद्रास हायकोर्टाने टिकटॉक अ‍ॅपवर घातलेल्या बंदीविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका करण्यात आली होती. मद्रास हायकोर्टाने केंद्र सरकारला याबाबत निर्देश देऊन टिकटॉक अ‍ॅपवर बंदी आणण्याची सूचना केली होती त्यानंतर केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून गुगल आणि अ‍ॅपलला टिकटॉक अ‍ॅप प्ले स्टोअरवरुन हटविण्याचे आदेश दिले होते. टिकटॉक अ‍ॅपच्या माध्यमातून समाजात अश्लिलता पसरवली जात आहे असा आरोप करत समाजसेवक आणि ज्येष्ठ वकील मुथु कुमार यांनी मद्रास हायकोर्टात याचिका दाखल केली होती. टिकटॉकच्या माध्यमातून आत्महत्या आणि गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप या याचिकेत करत टिकटॉकवर बंदी आणावी अशी मागणी करण्यात आली होती. 

मात्र सुप्रीम कोर्टाने मद्रास हायकोर्टाला दिलेल्या आदेशामुळे 24 एप्रिल रोजी सोशल मिडीयामध्ये भारतात मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेल्या टिकटॉक अ‍ॅपवरील बंदी उठवण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने गुगल आणि अ‍ॅपला प्ले स्टोअरमधून टिकटॉक अ‍ॅप हटविण्यास सांगितले होते. सरकारच्या या आदेशानंतर लोकांना आता टिकटॉक अ‍ॅप डाउनलोड करता येत नव्हते मात्र ज्या लोकांकडे आधीपासून हा अ‍ॅप आहे त्यांना तो पहिल्यासारखा वापरता येत होते.

TikTok अ‍ॅपवर बंदी आणण्याचे गुगल, अ‍ॅपलला आदेश

टिकटॉक अ‍ॅप सोशल मिडीयामध्ये तरुणाईमध्ये प्रसिद्ध अ‍ॅप आहे. मद्रास हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात टिकटॉकने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टानेही मद्रास हायकोर्टाचा निर्णय जैसे थे ठेवल्याने केंद्र सरकारने टिकटॉक अ‍ॅपला दणका दिला होता. तसेच पुन्हा २२ एप्रिल रोजी सुप्रीम कोर्टामध्ये टिकटॉक अ‍ॅपबाबत सुनावणी घेण्यात येणार होती. ती सुनावणी आज झाली. त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने हा आदेश मद्रास हायकोर्टाला दिला.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयTik Tok Appटिक-टॉकHigh Courtउच्च न्यायालय