शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च न्यायालयाचे सलग १० तास काम; ७५ खटल्यांची करण्यात आली सुनावणी; विविध याचिका निकाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2022 10:37 IST

न्यायालयाच्या नियमित वेळेपेक्षा अधिक तास या खंडपीठाने काम केले. 

नवी दिल्ली:सर्वोच्च न्यायालयाचे न्या. धनंजय चंद्रचूड व न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठाने शुक्रवारी रात्री ९.१० वाजेपर्यंत विविध याचिकांची सुनावणी घेतली. या खंडपीठाने त्यादिवशी १० तास ४० मिनिटे सुनावणीचे काम केले. त्यामध्ये ७५ खटल्यांचा निपटारा करण्यात आला. न्यायालयाच्या नियमित वेळेपेक्षा अधिक तास या खंडपीठाने काम केले. 

सर्वोच्च न्यायालयाची कामकाजाची वेळ सकाळी साडेदहा ते संध्याकाळी चार इतकी असते. पुढील आठवड्यात दसऱ्याच्या सुट्टीनिमित्त न्यायालयाचे कामकाज बंद राहील.  त्यामुळे न्या. चंद्रचूड व न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठाने शुक्रवारी दहा तासांहून अधिक काळ सुनावणीचे काम केले. रात्री नऊ वाजेपर्यंत सुनावणी सुरू ठेवण्याच्या निर्णयाला वकील व कर्मचाऱ्यांनीही पाठिंबा दिला.  सुनावणी संपताच खंडपीठाने वकील व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. (वृत्तसंस्था)

या दोन कारणांसाठीच पुढे ढकलणार सुनावणी

शुक्रवारसाठी सूचिबद्ध करण्यात आलेल्या खटल्याची सुनावणी पुढे ढकलावी, अशी विनंती एका वकिलाने केली होती. त्यावर न्या. धनंजय चंद्रचूड व न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठाने सांगितले की, याचिका सुनावणीसाठी सूचिबद्ध होत नाहीत, अशी तक्रार वकील करतात. मात्र, जेव्हा प्रकरण न्यायालयासमोर येते तेव्हा वकील सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी करतात. सुनावणीची तारीख कोरोना साथ किंवा एखाद्याच्या मृत्यूची घटना या दोन कारणांमुळेच पुढे ढकलली जाऊ शकते, असे खंडपीठाने म्हटले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय