शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
3
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
4
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
5
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
6
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
7
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
8
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
9
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
10
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
11
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
12
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
13
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
14
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
15
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
16
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
17
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
18
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
19
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
20
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर

"देशात धार्मिक युद्ध भडकवण्यासाठी सुप्रीम कोर्ट जबाबदार"; मर्यादेबाहेर जाताय म्हणत भाजप खासदाराची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 19:03 IST

वक्फ कायद्यावर सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या सुनावणीवरुन भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मोठं विधान केले आहे.

BJP MP Nishikant Dubey on Supreme Court:  नव्या वक्फ कायद्याला विरोधकांनी आव्हान दिल्यानंतर सुप्रीम कोर्टाने दोन कलमांच्या अंमलबजावणीवर स्थगिती देत मंजुरी दिली होती. त्यानंतर  ७ दिवसांत केंद्र सरकारला दोन मुद्द्यांवर भूमिका सादर करण्याचे निर्देश दिले. वक्फ कायद्याबाबत सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीवर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी शनिवारी तिखट प्रतिक्रिया दिली. जर कायदे करणे हे सर्वोच्च न्यायालयाचे काम असेल तर संसद भवन बंद केले पाहिजे, असं विधान खासदार निशिकांत दुबे यांनी केले आहे. देशात धार्मिक युद्धे भडकवण्यास सुप्रीम कोर्ट जबाबदार असल्याचेही दुबे म्हणाले.

वक्फ कायद्यातील सुधारणांना आव्हान देणाऱ्या अनेक याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु असाताना निशिकांत दुबे यांनी हे विधान केले. त्याआधी वक्फ कायद्याविरुद्धच्या याचिकांवर सुनावणी होण्यापूर्वी, केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी सुप्री कोर्ट या कायदेशीर बाबीवर भाष्य करणार नाही असा विश्वास आहे असे म्हटले होते. कायदेमंडळ आणि न्यायपालिका यांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे असेही त्यांनी म्हटले होते. त्यानंतर आता दुबे यांनी केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

"मी कलम १४१ चा भरपूर अभ्यास केला आहे. कलम १४१ नुसार आम्ही जे कायदे बनवतो ते कनिष्ठ न्यायालयापासून सुप्रीम कोर्टापर्यंत लागू होतात. पण कलम ३६८ नुसार देशाच्या संसदेला सर्व कायदे बनवण्याचा अधिकार आहे. कायद्याची व्याख्या करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे. या देशात धार्मिक युद्धे भडकवण्यात फक्त सु्प्रीम कोर्ट जबाबदार आहे. सुप्रीम कोर्ट त्यांच्या मर्यादेच्या बाहेर जात आहे. जर प्रत्येक गोष्टीसाठी सुप्रीम कोर्टात जावे लागत असेल तर संसद आणि राज्यातील विधानसभा बंद केल्या पाहिजेत," असं निशिकांत दुबे म्हणाले.

दरम्यान, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही गुरुवारी न्यायव्यवस्थेविरुद्ध कडक टीका केली होती. न्यायालये राष्ट्रपतींना आदेश देऊ शकत नाहीत, असे उपराष्ट्रपती म्हणाले होते. न्यायालयांना राष्ट्रपतींना निर्देश द्यावे लागतील अशी परिस्थिती आपण निर्माण करू शकत नाही, असे जगदीप धनखड म्हणाले. संविधानाच्या कलम १४२ अंतर्गत न्यायालयाला देण्यात आलेले विशेष अधिकार हे आता लोकशाही शक्तींविरुद्ध क्षेपणास्त्र बनल्याचेही धडखड यांनी म्हटलं.

टॅग्स :waqf board amendment billवक्फ बोर्डSupreme Courtसर्वोच्च न्यायालयBJPभाजपा