शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रीम कोर्टात होणार मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या भवितव्याचा फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 07:41 IST

येडियुरप्पा यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला असला तरी कर्नाटकी नाट्यावर पडदा पडलेला नाही. रातोरात सर्वोच्च न्यायालयात जाऊन हा शपथविधी न होऊ देण्यात काँग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांना यश आले नाही.

नवी दिल्ली/बंगळुरू : येडियुरप्पा यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला असला तरी कर्नाटकी नाट्यावर पडदा पडलेला नाही. रातोरात सर्वोच्च न्यायालयात जाऊन हा शपथविधी न होऊ देण्यात काँग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांना यश आले नाही. परंतु झालेल्या शपथविधीची वैधता कोर्टाच्या निर्णयाने ठरणार असल्याने, शुक्रवारच्या सुनावणीत काय होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.राज्यपाल वजुभाई वाला यांनी गुरुवारी सकाळी ९ वाजता राजभवनात येडियुरप्पा यांना पदाची शपथ दिली. पण हे सत्तानाट्य अंगाशी येण्याची शक्यता असल्याने या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा उपस्थित नव्हते. शपथ घेताना स्वत: येडियुरप्पाही फारसे आनंदी वाटत नव्हते. शपथविधीच्या विरोधात काँग्रेस व जेडीएसच्या आमदारांनी कर्नाटक विधानसभेबाहेर धरणे सुरू केले. दोन्ही पक्षांचे सर्व तसेच अन्य व अपक्ष असे तीन आमदारही त्याला उपस्थित होते, असे सांगण्यात आले. विधानसभेबाहेर राज्यपाल व येडियुरप्पांच्या विरोधात घोषणा सुरू असताना, बंगळुरूसह संपूर्ण राज्यभर भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. बहुमत सिद्ध केल्यावर आपण मंत्रिमंडळाचा विस्तार करू, असे येडियुरप्पा यांनी नंतर जाहीर केले. तसेच शेतकऱ्यांचे १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. या घोषणेमुळे काही विरोधी आमदार आपणास येऊ न मिळतील, अशी त्यांना अपेक्षा आहे.>३२ लिंगायत आमदारांवर लक्ष?काँग्रेस व जनता दलातील लिंगायत आमदारांकडे भाजपाने लक्ष केंद्रित केले आहे. वोक्कालिंग समाजाच्या कुमारस्वामींना मुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय दोन्ही पक्षांतील लिंगायत आमदारांना मान्य नसल्याने ते फुटतील, अशी चर्चा आहे. काँग्रेसचे २१, तर जनता दलाचे १0 आमदार लिंगायत आहेत. काँग्रेसचे २ लिंगायत आमदार गायब असून, ते भाजपाच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे.>सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणीबहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी येडियुरप्पांना १५ दिवसांची मुदत दिली असली तरी काँग्रेसच्या याचिकेची सुनावणी शुक्रवारी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. त्या वेळी येडियुरप्पा यांनी राज्यपालांना दिलेली आमदारांची यादी कोर्टासमोर ठेवली जाईल. ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी यांनीही शपथविधीला स्वतंत्र आव्हान दिले, तेही उद्या या खंडपीठापुढे आपले म्हणणे मांडतील.>मोदीस्टाईल सुरुवात : शपथविधी झाल्यानंतर येडियुरप्पा यांनी मंदिरात देवदर्शन घेतले आणि नंतर विधानसभेच्या पायºयांवर ते नतमस्तक झाले. नरेंद्र मोदी यांनीही पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदा संसदेत जाण्याआधी अशीच कृती केली होती.

टॅग्स :Yeddyurappaयेडियुरप्पाcongressकाँग्रेसBJPभाजपाKarnatakकर्नाटकKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८