शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

केरळमधील सबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशावर आज सुप्रीम निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 10:02 IST

सबरीमाला मंदिरात 10 ते 50 वर्ष वयोगटातील महिलांना प्रवेश नाही

नवी दिल्ली: केरळमधील सबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशाबद्दल आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. सबरीमाला मंदिरात 10 ते 50 वर्ष वयोगटातील महिलांना प्रवेश दिला जात नाही. हा नियम घटनेच्या दृष्टीनं योग्य आहे की नाही, यावर आज सर्वोच्च न्यायालयाचं घटनापीठ निकाल देईल. सबरीमाला मंदिरात विराजमान असणारे अयप्पा ब्रम्हचारी असल्यानं या मंदिरात 10 ते 50 वर्ष वयोगटातील महिलांना प्रवेश दिला जात नाही, अशी मंदिर प्रशासनाची भूमिका आहे. मंदिराकडून महिलांसोबत कोणताही भेदभाव केला जात नाही. त्यामुळे न्यायालयानं धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करू नये, अशी भूमिका मंदिर प्रशासनानं घेतली आहे. केरळच्या सबरीमाला मंदिरात विराजमान असलेले अयप्पा ब्रम्हचारी आहेत, अशी श्रद्धा आहे. याशिवाय सबरीमाला यात्रेच्या आधी 41 दिवस कठोर व्रत करण्याचा नियम आहे. मासिक पाळीमुळे महिला सलग 41 दिवस व्रत करू शकत नाहीत. त्यामुळेच 10 ते 50 या वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही. हा नियम संविधानाच्या दृष्टीनं योग्य आहे की नाही, याबद्दल आज सर्वोच्च न्यायालयाचं घटनापीठ निर्णय देणार आहे. मागील सुनावणीत काय घडलं?मागील सुनावणीत मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांच्या वतीनं वकील साई दीपक यांनी बाजू मांडली. हे प्रकरण सामाजिक न्यायाचं नाही, असा दावा त्यांनी केला. 'मंदिर पर्यटनस्थळ नाही. याठिकाणी यायचं असल्यास देवावर श्रद्धा हवी. ज्यांचा देवाच्या सर्वमान्य स्वरुपावर विश्वास नाही, त्यांच्या याचिकांवर न्यायालयाकडून सुनावणी सुरू आहे,' असं साई दीपक म्हणाले. न्यायालयानं काय म्हटलं? धार्मिक नियम संविधानाच्या दृष्टीनं योग्य असायला हवेत, असं 5 न्यायाधीशांच्या घटनापीठातील डी. वाय. चंद्रचूड यांनी म्हटलं. 'कोणती गोष्ट धर्माचा अविभाज्य घटक आहे, याचा विचार न्यायालयानं का करावा? आम्ही न्यायाधीश आहोत. धर्माचे जाणकार नाहीत,' असं चंद्रचूड म्हणाले. 'धर्माच्या नियमांचं पालन करण्याच्या काही सीमा आहेत. धर्माच्या नियमांमुळे दुसऱ्यांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणू शकत नाही,' असं न्यायमूर्ती रोहिंग्टन नरीमन यांनी सुनावणीवेळी म्हटलं.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयKeralaकेरळ