शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Aadhaar Card Verdict: सर्वोच्च निकाल! आधारला सुप्रीम कोर्टाचा आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 12:07 IST

आधारच्या वैधतेबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

नवी दिल्ली: आधार कार्ड वैध असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. आधार कार्डमुळे गोपनीयतेच्या अधिकाराचं उल्लंघन होत असल्याचा दावा करणाऱ्या याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. यावर गेल्या चार महिन्यांपासून सुनावणी सुरू होती. आज सर्वोच्च न्यायालयानं याप्रकरणी निकाल दिला. आधार कार्ड वैधच असल्याचं न्यायालयानं म्हटलं. आधार कार्डमुळे देशातील सामान्य नागरिकाला वेगळी ओळख मिळाल्याचं न्यायालयानं निकालाच्या वाचनात म्हटलं आहे.केंद्र सरकारनं कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य केलं होतं. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाच 27 याचिका दाखल झाल्या होत्या. आधार कार्डच्या सक्तीमुळे घटनेनं नागरिकांना दिलेल्या गोपनीयतेच्या अधिकाराचं उल्लंघन होत असल्याचा आक्षेप नोंदवण्यात आला होता. यावर आज सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला. पॅन लिंक करण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. मात्र सीम कार्ड खरेदी करण्यासाठी आधार गरजेचं नाही, खासगी कंपन्यांना आधारची सक्ती करता येणार नाही, असा निकाल न्यायालयानं दिला. याशिवाय शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आधार कार्ड गरजेचं नसल्याचं न्यायालयानं म्हटलं. आधार कार्ड वैध की अवैध याबद्दल सुनावणी करताना न्यायालयानं आधार कार्ड आणि इतर ओळखपत्रांमध्ये फरक असल्याचं म्हटलं. आधार कार्डसाठी व्यक्तीच्या हाताचे ठसे घेतले जातात. त्याशिवाय डोळ्यांचं स्कॅनिंगदेखील केलं जातं. त्यामुळे आधार कार्ड सर्वार्थानं वेगळं ठरतं, असं न्यायालयानं निकाल सुनावताना म्हटलं. आधी शिक्षणामुळे आपण अंगठ्यापासून स्वाक्षरीपर्यंत आलो. मात्र आता तंत्रज्ञानामुळे आपण पुन्हा स्वाक्षरीकडून अंगठ्याकडे जात आहोत, असं भाष्य सर्वोच्च न्यायालयानं निकालाचं वाचन करताना केलं. 

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डSupreme Courtसर्वोच्च न्यायालय