शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील प्रदूषण रोखा, प्रसंगी लॉकडाऊन लावा; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 05:52 IST

दिल्लीतील विषारी हवेच्या मुद्यावर दाखल झालेल्या एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश एन. व्ही. रमना यांच्या नेतृत्वाखालील न्यायपीठाने या सूचना केंद्र सरकारला केल्या.

नवी दिल्ली : दिल्लीतील प्रदूषित हवेवरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले असून प्रदूषण कमी करण्यासाठी वाहनांवर बंदी अथवा लॉकडाऊनसारख्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.दिल्लीतील विषारी हवेच्या मुद्यावर दाखल झालेल्या एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश एन. व्ही. रमना यांच्या नेतृत्वाखालील न्यायपीठाने या सूचना केंद्र सरकारला केल्या. दिल्लीतील हवा इतकी खराब झाली आहे की, आम्हाला आपल्याच घरात मास्क लावावा लागत आहे, असे न्यायालयाने म्हटले. पंजाबच्या शेतातील पीक काढल्यानंतर उरणारी धसकटे जाळल्यामुळे मागील पाच-सहा दिवसांत प्रदूषण वाढले आहे, असे प्रतिपादन केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात केले. त्यावरून न्यायालय आणि सरकारी वकील यांच्यात वाद झाला. प्रदूषणास केवळ शेतांतील धसकटांचे जळणे जबाबदार आहे, असे सिद्ध करण्याचा तुम्ही का प्रयत्न करीत आहात, प्रदूषणाच्या इतर घटकांचे काय, असे न्या. रमना यांनी विचारले. तसेच प्रदूषण रोखण्यासाठी तुमच्याकडे आपत्कालिन योजना काय आहे, अशी विचारणा सरकारला केली. मेहता यांनी म्हटले की, प्रदूषणास केवळ शेतकरी जबाबदार आहेत, असे आम्ही म्हटलेले नाही. त्यावेळी न्या. डी. वाय. चंद्रचूड यांनी म्हटले की, शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ मिळाले नाही, तर बदल होण्याची शक्यता नाही. हवा विषारी झालेली असतानाही शाळा सुरू असल्यामुळे मुलांना बाहेर पडावे लागत आहे. एम्सचे प्रमुख रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे की, एकीकडे कोविड, डेंग्यू आणि दुसरीकडे प्रदूषण आहे. आणि मुले अशा हवामानात बाहेर पडत आहेत.दिल्लीत शाळा उद्यापासून आठवडाभर राहणार बंददिल्लीत वाढलेल्या प्रदूषणामुळे तेथील शाळा व महाविद्यालये सोमवारपासून आठवडाभर बंद ठेवण्याचा, तसेच बांधकामे बंद ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारने घेतला आहे, तसेच दिल्लीचे सर्व सरकारी कर्मचारी आठवडाभर घरातून काम करणार आहेत.खासगी कार्यालयांसाठी वेगळा आदेश जारी केला जाईल. प्रदूषणासंदर्भात बोलविलेल्या तातडीच्या बैठकीत केजरीवाल यांनी हे निर्णय घेतले, तसेच दिल्लीत लॉकडाऊन लागू करण्याबाबतचा प्रस्ताव केजरीवाल सरकार सर्वोच्च न्यायालयाला सादर करणार आहे. शनिवारी दिल्लीतील हवेचा सरासरी गुणवत्ता निर्देशांक ५०० वर नोंदवला गेला, जो गंभीर श्रेणीत आहे.दिल्ली- एनसीआरच्या ढासळत्या हवामानात सुधारणा होण्याची चिन्हे नाहीत. शनिवारी दिल्लीची हवा अधिकच विषारी झाल्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तातडीची बैठक बोलावली. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय