शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सायरस मिस्त्री यांना सर्वाेच्च न्यायालयाचा दणका; कायदेशीर लढ्यात रतन टाटांची सरशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 06:15 IST

अध्यक्षपदी नियुक्तीचा आदेश रद्द, टाटा सन्सचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून पुन्हा नियुक्त करण्याचा आदेश न्यायाधिकरणाने डिसेंबर २०१९ मध्ये दिला हाेता.

नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्याेगपती रतन टाटा यांना सर्वाेच्च न्यायालयाने माेठा दिलासा दिला आहे. सायरस मिस्त्री यांना न्यायालयाने दणका देताना टाटा समूहाची हाेल्डिंग कंपनी टाटा सन्सचे पुन्हा अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्याचा राष्ट्रीय कंपनी विधी अपील न्यायाधिकरणाने दिलेला आदेश रद्द केला आहे. भारतातील हा सर्वात माेठा काॅर्पाेरेट वाद हाेता. या खटल्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले हाेते. 

टाटा सन्सचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून पुन्हा नियुक्त करण्याचा आदेश न्यायाधिकरणाने डिसेंबर २०१९ मध्ये दिला हाेता. तसेच त्यांच्या जागी एन. चंद्रशेखर यांची नियुक्तीही बेकायदेशीर ठरविली हाेती. या निकालाविराेधात अपील करण्यासाठी टाटा समूहाला चार आठवड्याचा कालावधी दिला हाेता. त्यानुसार निर्णयाविराेधात जानेवारी २०२० मध्ये टाटा समूहाने सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल केली हाेती. सरन्यायाधीश शरद बाेबडे, न्या. ए. एस. बाेपन्ना आणि न्या. व्ही. रामसुब्रमण्यम यांच्या खंडपीठासमाेर याचिकेची सुनावणी झाली. न्यायालयाने १७ डिसेंबर २०२० राेजी निकाल राखून ठेवला हाेता. न्यायालयाने टाटा समूहाच्या बाजूने निर्णय देऊन न्यायाधिकरणाने दिलेला आदेश रद्द केला. 

टाटा सन्स ही द्विसमूह कंपनी नसून सायरस इन्व्हेस्टमेंटसाेबत काेणत्याही प्रकारची भागीदारी नसल्याचे टाटा समूहातर्फे स्पष्ट करण्यात आले हाेते. ऑक्टाेबर २०१६ मध्ये झालेल्या कंपनी बाेर्डाच्या बैठकीत मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हटविण्यात आले हाेते. कंपनीने २०१७ मध्ये त्यांच्या जागी ‘टीसीएस’चे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक एन. चंद्रशेखर यांची नियुक्ती करण्यात आली हाेती. हा प्रकार ‘घातपात’ असल्याचे सांगून शापूरजी पालाेनजी समूहाच्या सायरस इन्व्हेस्टमेंट आणि स्टर्लिंग इन्व्हेस्टमेंट या दाेन कंपन्यांनी लवादात धाव घेतली हाेती. लवादाने त्यांच्या बाजूने निर्णय देऊन मिस्त्री यांना पुन्हा अध्यक्षपदी नियुक्त करण्याचे आदेश दिले हाेते. 

काय आहे प्रकरण?शापूरजी पालनजी यांचे वंशज सायरस मिस्त्री यांनी २०१२ मध्ये सुमारे १०० अब्ज मूल्य असलेल्या टाटा सन्सचे सहावे अध्यक्ष म्हणून रतन टाटा यांच्याकडून जबाबदारी स्वीकारली हाेती. टाटा समूहाच्या मंडळात शापूरजी पालनजी समूहाचे प्रतिनिधी म्हणून त्यांचा समावेश हाेता. मिस्त्री कुटुंबीयांचा टाटा सन्समध्ये १८.३७ टक्के वाटा आहे. समूहाच्या १०० हून अधिक कंपन्या टाटा सन्सच्या छत्राखाली येतात. मिस्त्री यांना २०१६ मध्ये हटविण्यात आले हाेते. मिस्त्री यांची कामगिरी अपेक्षेनुसार राहिली नाही. त्यांच्या कार्यकाळात टाटा सन्सचे नुकसान झाल्याचे टाटा समूहाकडून सांगण्यात आले हाेते. त्यानंतर रतन टाटा यांची अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. २०१७ मध्ये मिस्त्री यांना टाटा सन्सच्या संचालक पदावरून तसेच समूहातील इतर पदांवरूनही हटविण्यात आले हाेते. याविराेधात मिस्त्री यांनी सर्वप्रथम न्यायाधिकरणाच्या मुंबई पीठाकडे दावा केला हाेता. तिथे त्यांचा दावा फेटाळण्यात आला हाेता. त्यामुळे अपील न्यायाधिकरणाने दाद मागितली हाेती. 

‘हा जय-पराजयाचा मुद्दा नाही’टाटा समूहाचे अंतरिम अध्यक्ष रतन टाटा यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. त्यांनी सांगितले, की टाटा समूहाची अखंडता आणि नैतिकतेवर न्यायालयाने शिक्कामाेर्तब केले आहे. हा जय आणि पराजयाचा मुद्दा नाही. माझा प्रामाणिकपणा आणि समूहाच्या नैतिक आचरणावर सातत्याने हल्ले करण्यात आले हाेते. न्यायपालिकेची निष्पक्षता या निर्णयामुळे बळकट झाली आहे.

 

टॅग्स :Ratan Tataरतन टाटाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय