शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता जप्तीबद्दल ईडीवर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे; सुनावणी सुरू असताना केली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 05:45 IST

एका खटल्याची सुनावणी असतानादेखील, त्या प्रकरणाशी संबंधित लोकांची काही मालमत्ता ईडीने जप्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : एका खटल्याची सुनावणी असतानादेखील, त्या प्रकरणाशी संबंधित लोकांची काही मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली. या कारवाईबद्दल सर्वोच्च न्यायालयाने ईडीवर ताशेरे ओढले आहेत. चूक सुधारण्यासाठी ईडीने पावले उचलावीत, असे आदेशही न्यायालयाने दिले.

सर्वोच्च न्यायालयाने २८ मार्चला दिलेल्या आदेशानुसार, याचिकाकर्त्यांनी याचिकेची प्रत ईडीला ३० मार्चला दिली होती. या याचिकेची सुनावणी १ एप्रिलला होईल असे न्यायलयाने आपल्या आदेशात स्पष्टपणे म्हटलेले होते. तरीही ३१ मार्चला ईडीने याचिकाकर्त्याची काही मालमत्ता जप्त केली. ही माहिती त्याच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अजय खानविलकर, न्या. अभय ओक यांच्या खंडपीठाला शुक्रवारी दिली. मालमत्ता जप्त केल्याच्या कारवाईबद्दल सर्वोच्च न्यायालयाने ईडीवर कडक ताशेर ओढले आहेत. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

पुढील सुनावणी ८ एप्रिलला

ईडीने विशिष्ट प्रकरणात याचिकाकर्त्याची संपत्ती जप्त करण्याची केलेली कारवाई मागे घ्यावी व त्यासंदर्भात उचललेल्या पावलांची माहिती पुढील सुनावणीच्या दिवशी ८ एप्रिलला न्यायालयाला सादर करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने ईडीला दिला आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय