शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

शाहीन बागेतले आंदोलक कायमस्वरुपी रस्ता अडवून धरू शकत नाही- सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 13:24 IST

पुढील सुनावणी १७ फेब्रुवारीला होणार

नवी दिल्ली: सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून शाहीन बागेत आंदोलन सुरू आहे. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयानं सरकारला आंदोलकांना हटवण्याचे आदेश दिले नाहीत. मात्र आंदोलन कायमस्वरुपी अशा प्रकारे रस्ता अडवून ठेवू शकत नाही, असं मत न्यायालयानं व्यक्त केलं. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ फेब्रुवारीला होईल. इतके दिवस प्रतीक्षा केलीच आहे, तर आता आणखी आठवडाभर प्रतीक्षा करावी, असं न्यायमूर्तींनी सुनावणीची पुढील तारीख देताना म्हटलं. शाहीन बागेतल्या आंदोलनादरम्यान एका चिमुरड्याचा मृत्यू झाला. या घटनेचीदेखील न्यायालयानं दखल घेतली. याविषयीदेखील आज सुनावणी झाली. दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर शाहीन बागेसंबंधीच्या याचिकांवर सुनावणी घेण्यात येईल, असं न्यायालयानं म्हटलं होतं. शाहीन बागेतल्या आंदोलकांना हटवण्यात यावं, अशी मागणी अनेक याचिकांमधून करण्यात आली आहे. शाहीन बागेतल्या आंदोलनाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर शुक्रवारीदेखील सुनावणी झाली. शाहीन बागेजवळील रस्ता बंद असल्यानं होणाऱ्या अडचणी आपण समजू शकतो, असं न्यायालयानं म्हटलं होतं. यानंतर न्यायालयानं पुढील सुनावणीसाठी आजची तारीख दिली होती. 'रस्ता अडवण्यात आल्यानं समस्या निर्माण झाल्याची आम्हाला जाणीव आहे. ही समस्या कशी सोडवायची, हा आमच्यासमोरील मोठा प्रश्न आहे,' असं न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती के. एम. जोसेफ यांच्या खंडपीठानं म्हटलं होतं. 

टॅग्स :National Register of Citizensएनआरसीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकSupreme Courtसर्वोच्च न्यायालय