शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पुतळ्यांवर खर्च केलेला जनतेचा पैसा परत करा; मायावतींना 'सर्वोच्च' धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 14:47 IST

मुख्यमंत्री असताना मायावतींनी मोठ्या प्रमाणात पुतळे उभारले होते

नवी दिल्ली: बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांना सर्वोच्च न्यायालयानं जोरदार दणका दिला आहे. मुख्यमंत्री असताना उभारण्यात आलेल्या स्मारकांवर आणि मूर्तींवर खर्च करण्यात आलेला पैसा परत करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. या प्रकरणी 2009 मध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी हा निकाल दिला. या प्रकरणातील पुढील सुनावणी 2 एप्रिल होणार आहे. ही सुनावणी मे महिन्यानंतर घेण्याची विनंती मायावतींच्या वकिलांनी केली होती. मात्र ही विनंती न्यायालयानं अमान्य केली. मायावती उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री असताना राज्यात मोठ्या प्रमाणात पुतळे उभारण्यात आले. त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. त्या प्रकरणी 2009 मध्ये एक जनहित याचिका दाखल करण्यात आली. या प्रकरणावर जवळपास 10 वर्षांनी सुनावणी झाली. 'प्रथमदर्शनी या प्रकरणाकडे पाहताना बसपा अध्यक्षांनी पुतळ्यांवर खर्च करण्यात आलेला जनतेचा पैसा परत करावा,' असं न्यायालयानं म्हटलं. या प्रकरणातील पुढील सुनावणी 2 एप्रिल रोजी होईल, असं सरन्यायाधीशांनी सांगितलं. मायावती मुख्यमंत्री असताना राज्यात अनेक ठिकाणी हत्तींचे पुतळे उभारण्यात आले. याशिवाय मायावतींनी स्वत:चेही अनेक पुतळे उभे केले. याशिवाय मायावतींनी काही उद्यानंदेखील उभारली. यात त्यांचे आणि हत्तींचे पुतळे उभे केले. काशीराम आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही पुतळे त्यांनी उभारले. त्यावेळी समाजवादी पार्टीनं याचा जोरदार निषेध केला होता. मात्र आता भाजपाविरोधात या दोन्ही पक्षांनी आघाडी केली आहे. आगामी लोकसभा निवडणूक हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या साथीनं लढवणार आहेत. 

टॅग्स :mayawatiमायावतीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय