शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

जज लोया मृत्यू प्रकरणातील पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 19:47 IST

सीबीआय न्यायालयाचे वकील बी. एच. लोया यांच्या मृत्यूचा तपास पुन्हा करावा यासाठी मुंबई वकील संघानं दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे.

नवी दिल्ली- सीबीआय न्यायालयाचे वकील बी. एच. लोया यांच्या मृत्यूचा तपास पुन्हा करावा यासाठी मुंबई वकील संघानं दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. जज लोया मृत्यूप्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, अशा प्रकारची याचिका मुंबई वकील संघानं दाखल केली होती. ती याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली असून, जज लोया यांचा मृत्यू नैसर्गिकरीत्या झाल्याचंही स्पष्ट केलं आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि ए. एम. खानविलकर यांच्या खंडपीठासमोर जज लोया मृत्यू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करणा-या याचिका फेटाळण्यात आल्या होत्या. त्यावेळी न्यायालयानं याचिकाकर्त्यांवर टिपण्णीही केली होती. जज लोया प्रकरणातील याचिका राजकीय हेतूनं प्रेरित होऊन दाखल केल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं. तसेच न्यायव्यवस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न आहे, असंही खडे बोल सर्वोच्च न्यायालयानं सुनावले होते.काय आहे जज लोया मृत्यू प्रकरण ?1 डिसेंबर 2014ला नागपूरमध्ये जज लोया यांचा मृत्यू झाला होता, आपल्या सहका-याच्या मुलीच्या लग्नाला जात असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. परंतु नोव्हेंबर 2017ला जज लोया यांचा मृत्यूबाबत त्यांच्या बहिणीनं संशय व्यक्त केला होता. त्यानंतर जज लोया मृत्यू प्रकरण चर्चेत आलं आणि त्याचा संबंध सोहराबुद्दीन शेख एकाऊंटरशी जोडण्यात आला होता. तसेच त्यांच्या मृत्यूची स्वतंत्र चौकशीच्या मागणीची याचिकाही सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. 19 एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयानं जज लोया यांच्या मृत्यू संबंधातील सर्वच याचिका फेटाळून लावल्या होत्या.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयJudge Loyaन्यायाधीश लोया