कन्हैयाच्या जामिनावर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

By Admin | Updated: February 19, 2016 12:24 IST2016-02-19T11:57:27+5:302016-02-19T12:24:16+5:30

जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारला शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने झटका दिला आहे.सर्वोच्च न्यायालयाने कन्हैयाच्या जामिन अर्जावर सुनावणीस नकार दिला.

Supreme Court rejects Kanheya's bail plea | कन्हैयाच्या जामिनावर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

कन्हैयाच्या जामिनावर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १९ - देशद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेला जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारला शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने झटका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने कन्हैयाच्या जामिन अर्जावर सुनावणीस नकार देत त्याला उच्च न्यायालयात दाद मागण्यास सांगितले. 
कन्हैयाने गुरुवारी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. दिल्ली सत्र न्यायालयात जीवीताला धोका असल्यामुळे आपण थेट सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केल्याचे कन्हैयाने म्हटले होते. घटनेच्या अनुच्छेद ३२ अंतर्गत नागरीक मूलभूत हक्कांसाठी थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतो. 
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही वारंवार पतियाळा हाऊस कोर्टात कायदा-सुव्यवस्थेचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे मला आणि माझ्या वकिलांना सत्र न्यायालयात जामिनासाठी दाद मागणे मुश्किल झाले आहे असे कन्हैयाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते. 
पोलिसांनी ११ फेब्रुवारील कन्हैयाला देशद्रोह आणि गुन्हेगारी कट रचण्याच्या आरोपाखाली अटक केली. १२ फेब्रुवारीला त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. १७ फेब्रुवारील न्यायदंडाधिका-यांनी त्याला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले. 
 

Web Title: Supreme Court rejects Kanheya's bail plea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.