शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 15:42 IST

दिल्लीतील व्यापारी हरप्रीत सिंह तलवार उर्फ ​​कबीर तलवार यांचा जामीन अर्ज मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला.

दिल्लीतील व्यापारी हरप्रीत सिंह तलवार उर्फ ​​कबीर तलवार यांचा जामीन अर्ज मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला. २१,००० कोटी रुपयांच्या मुंद्रा बंदरातील ड्रग्ज प्रकरणात तलवार दाम्पत्याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने म्हटले की, सध्या त्यांच्याविरुद्ध दहशतवादी संघटनेला निधी पुरवल्याचा आरोप अकाली आहे. मात्र, न्यायालयाने तलवार यांना सहा महिन्यांनंतर पुन्हा जामीन अर्ज दाखल करण्याची मुभा दिली आहे.

सुनावणीदरम्यान, न्यायालयाने असेही निर्देश दिले की, विशेष न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी जलदगतीने करावी आणि दर महिन्याला दोनदा खटल्यावर सुनावणी करावी. यापूर्वी २३ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता. या प्रकरणात, राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) न्यायालयाला सांगितले होते की, हरप्रीत सिंह तलवार यांना ड्रग्जच्या विक्रीतून मिळालेला पैसा दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाला निधी देण्यासाठी वापरला जात होता.

२०२२ मध्ये एनआयएने केलेली अटककबीर तलवार दिल्लीत एक प्रसिद्ध नाईट क्लब चालवत होते. ऑगस्ट २०२२मध्ये त्यांना एनआयएने अटक केली होती. देशातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या ड्रग्ज रिकव्हरी प्रकरणात हरप्रीत सिंह तलवार आरोपी आहे. सप्टेंबर २०२१मध्ये मुंद्रा बंदरावर अफगाणिस्तानातून इराणमार्गे येणाऱ्या कंटेनरमध्ये तपासणी दरम्यान तब्बल २,९८८ किलो हेरॉइन जप्त करण्यात आले होते, ज्याची किंमत सुमारे २१,००० कोटी रुपये होती. एजन्सींना जप्त करण्यात यश आलेला हा सहावा आणि शेवटचा कंटेनर होता. या प्रकरणात अनेकांना अटक करण्यात आली आहे, ज्यात काही अफगाण नागरिकांचाही समावेश आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयDrugsअमली पदार्थCrime Newsगुन्हेगारीdelhiदिल्ली