शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

हार्दिक पटेल यांना सुप्रीम कोर्टाचा झटका; तात्काळ सुनावणी करण्यास नकार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 13:25 IST

लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांना गुजरात हायकोर्टानंतर आता सुप्रीम कोर्टानेही दणका दिला आहे. 

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांना गुजरात हायकोर्टानंतर आता सुप्रीम कोर्टानेही दणका दिला आहे. 

2015 मध्ये मेहसाणामध्ये दंगल भडकवल्याप्रकरणी वीसनगर कोर्टाने हार्दिक पटेल यांना दोषी ठरविले होते आणि दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. या निर्णयाविरोधात हार्दिक पटेल यांनी गुजरात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने ही याचिका फेटाळली होती. त्यानंतर हार्दिक पटेल यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. 

दरम्यान, याप्रकरणी आज सुप्रीम कोर्टाने तात्काळ सुनावणी करण्यास नकार दिला आहे. तसेच, या प्रकरणाची पुढील सुनावणी करण्यासाठी 4 एप्रिलला होणार आहे. त्यामुळे हार्दिक पटेल यांच्या निवडणूक लढण्याच्या शक्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. कारण, उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख सुद्धा 4 एप्रिलच आहे.

आरक्षणाच्या मुद्यावरून केलेल्या आंदोलनात हार्दिक पटेल विरुद्ध विविध 17 गंभीर गुन्ह्यांची नोंद पोलिसांनी केली आहे. अशा प्रकारचे गंभीर गुन्हे असले तर निवडणूक लढवायला परवानगी दिली जात नाही.  त्यामुळे या प्रकरणांना स्थगिती द्यावी अशी मागणी हार्दिक पटेल यांनी कोर्टात केली आहे. 

हार्दिक पटेल यांनी 21 फेब्रुवारीला उत्तर प्रदेशमध्ये सपा मुख्यालयात अखिलेश यादव यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी पटेल यांनी सपा-बसपा युतीचे स्वागत केले होते. तसेच ही युती भाजपाला हरवू शकते असेही म्हटले होते. लोक भाजपापासून त्रासलेले असून त्याना सुटका हवी आहे, असे वक्तव्य पटेल यांनी केले होते. 

टॅग्स :hardik patelहार्दिक पटेलSupreme Courtसर्वोच्च न्यायालयLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकGujaratगुजरात