शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

अमिताभ बच्चन यांच्या 'झुंड'चे स्ट्रिमिंग OTT वर थांबवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 19:01 IST

Jhund On OTT : न्या. एल नागेश्वर राव, बीआर गवई आणि एएस बोपण्णा यांच्या खंडपीठाने सांगितले की, 5 मेच्या आदेशानुसार चित्रपटाच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यास परवानगी देण्यात आली आहे.

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) गुरुवारी अमिताभ बच्चन स्टारर हिंदी चित्रपट 'झुंड'चे ओव्हर द टॉप (OTT) प्लॅटफॉर्मवर स्ट्रीमिंग रोखण्यास नकार दिला आहे. न्या. एल नागेश्वर राव, बीआर गवई आणि एएस बोपण्णा यांच्या खंडपीठाने सांगितले की, 5 मेच्या आदेशानुसार चित्रपटाच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यास परवानगी देण्यात आली आहे.

हैदराबादस्थित चित्रपट निर्माते नंदी चिन्नी कुमार यांनी दाखल केलेल्या पुनर्निरीक्षण याचिका तेलंगणा उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेत उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर लगेच कॉपीराइट उल्लंघनाचा आरोप केला होता. झुंड चित्रपटाच्या हक्कांबाबत पक्षकारांमध्ये कनिष्ठ न्यायालयात एक समझोता डिक्री पारित करण्यात आली. प्रतिवादी क्रमांक 1 (नंदी) यांनी फसवणूक झाल्याच्या कारणास्तव डिक्रीला आव्हान दिले. त्यांनी एक याचिका देखील दाखल केली. उच्च न्यायालयासमोरील ती रिट याचिका फेटाळण्यात आली. ट्रायल कोर्टानेही सेटलमेंट डिक्री मागे घेण्याचा अर्ज फेटाळला. यापूर्वी, तेलंगणा उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने  OTT वर चित्रपट प्रदर्शित करण्यास स्थगिती दिली होती. मात्र, ZEE5 वर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात चित्रपट निर्माता सुपर कॅसेट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड (टी सीरीज) च्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. यापूर्वी ४ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला हा चित्रपट ६ मे रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. 29 एप्रिल रोजी, उच्च न्यायालयाने आपल्या अंतरिम आदेशात OTT प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करण्याबाबत यथास्थिती ठेवण्याचे आदेश दिले होते. 'झुंड'च्या निर्मात्यांनी कॉपीराइटचे उल्लंघन केल्याचा आरोप करणाऱ्या कुमार यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हा आदेश देण्यात आला.तत्पूर्वी, कुमार यांनी चित्रपटाच्या थिएटर रिलीजवर मनाई घालण्याची मागणी केली होती. चित्रपट निर्मात्यांविरूद्धच्या पूर्वीच्या खटल्यात सेटलमेंटच्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता, तथापि, ट्रायल कोर्टाने सेटलमेंटसाठी परत बोलावण्याची विनंती नाकारली आणि चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यास परवानगी दिली. 

त्यानंतर, हा चित्रपट 4 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर कुमार यांनी उच्च न्यायालयात ट्रायल कोर्टाच्या आदेशाला आव्हान दिले आणि 29 एप्रिल रोजी अंतरिम आदेश पारित केला. स्लम सॉकर या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित 'झुंड' हा चरित्रात्मक क्रीडा चित्रपट आहे.

टॅग्स :Jhund Movieझुंड चित्रपटAmitabh Bachchanअमिताभ बच्चनSupreme Courtसर्वोच्च न्यायालय