शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारला मोठा दिलासा; सवर्ण आरक्षणाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 11:57 IST

आरक्षण प्रकरणावर न्यायालयाकडून मोदी सरकारला नोटीस

नवी दिल्ली: आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना 10 टक्के आरक्षण देण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. त्यामुळे सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. या नोटिसला उत्तर देण्यासाठी न्यायालयानं सरकारला 4 आठवड्यांची मुदत दिली आहे. मोदी सरकारनं सवर्णांना 10 टक्के आरक्षण देणारं विधेयक संसदेत मंजूर करुन घेतलं. मात्र याविरोधात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली. ही याचिका न्यायालयानं स्वीकारली असून केंद्राला नोटीसदेखील बजावली आहे. मात्र याप्रकरणी न्यायालयानं सरकारला दिलासाही दिला. या आरक्षणाला तातडीनं स्थगिती देण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. मात्र न्यायालयानं नकार दिला. आम्ही या प्रकरणातले सर्व तपशील तपासून पाहू, असं सरन्यायाधीश रंजन गोगोईंच्या खंडपीठानं यावरील सुनावणीदरम्यान म्हटलं.याचिकेत नेमकं काय?आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना आरक्षण देण्यासाठी घटनेच्या 124 व्या कलमात बदल करण्यात आला. त्याला जनहित याचिकेच्या माध्यमातून आव्हान देण्यात आलं आहे. आरक्षणाला आर्थिक आधार असू शकत नाही, असा दावा याचिकेतून करण्यात आला आहे. मोदी सरकारनं संसदेत मांडलेलं विधेयक आरक्षण देण्याच्या घटनेच्या मूळ सिद्धांतांच्या विरुद्ध होतं. सवर्णांना देण्यात आलेल्या आरक्षणामुळे 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली, असे आक्षेप याचिकाकर्त्यांनी नोंदवले आहेत. सरकारनं कोणतीही आकडेवारी आणि माहिती न घेता आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्याचा दावादेखील याचिकेतून करण्यात आला आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयreservationआरक्षण