शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

शाळांच्या वार्षिक शुल्काला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 09:04 IST

विनाअनुदानित शाळाप्रकरणी दिल्ली सरकारची होती याचिका

ठळक मुद्दे३१ मे २०२० रोजी उच्च न्यायालयाच्या एकल पीठाने हे आदेश रद्द केले. उच्च न्यायालयाने १५ टक्के ट्युशन शुल्क कमी करून शुल्क वसूल करण्याची परवानगी शाळांना दिली

डॉ. खुशालचंद बाहेतीनवी दिल्ली : खासगी विना अनुदानित शाळांना वार्षिक शुल्क आणि विकास निधी घेण्यास परवानगी देणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशास स्थगिती मागणारी दिल्ली सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. १८ एप्रिल २०२० आणि २८ ऑगस्ट २०२० रोजी दिल्ली सरकारने खासगी विना अनुदानित शाळांना कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर वार्षिक शुल्क व विकास शुल्क घेण्यास प्रतिबंध करणारा आदेश जारी केला होता. याविरुद्ध खासगी शाळा मालकांनी उच्च न्यायालयात दाद मागितली.

३१ मे २०२० रोजी उच्च न्यायालयाच्या एकल पीठाने हे आदेश रद्द केले. उच्च न्यायालयाने १५ टक्के ट्युशन शुल्क कमी करून शुल्क वसूल करण्याची परवानगी शाळांना दिली. या आदेशाविरुद्ध दिल्ली सरकारने पुनर्विलोकन याचिका दाखल केली. ७ जूून रोजी पुनर्विलोकन याचिका सुनावणीस आली असता, न्या. रेखा पल्ली आणि अमित बन्सल यांच्या खंडपीठाने या निर्णयास अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला.

खंडपीठाच्या स्थगिती नाकारण्याच्या निर्णयाविरुद्ध दिल्ली सरकार सर्वोच्च  न्यायालयात गेले होते. खासगी विना अनुदानित शाळा आणि तेथील विद्यार्थांचे पालक यांच्यामधील व्यवहाराबद्दल दिल्ली सरकारला चिंता वाटण्याचे कारण काय, असा प्रश्न सर्वोच्च  न्यायालयाने विचारला. यावर सरकारकडे विद्यार्थ्यांचे पालकत्व असते असे, म्हणत दिल्ली सरकारच्या वकिलांनी दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय स्थगित करण्याचा आग्रह धरला. या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठात दाखल पुनर्विलोकन याचिका १२ जुलै रोजी सुनावणीस येणार आहे. दिल्ली सरकारला यावेळी आपले सर्व मुद्दे मांडता येतील, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली.

सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणीदिल्ली सरकारने उच्च न्यायालय खंडपीठापुढे आपले सर्व मुद्दे मांडावेत. सर्वोच्च  न्यायालयाने स्थगितीस दिलेला नकार म्हणजे सरकारच्या मुद्द्यांबाबत कोणतेही मत व्यक्त केलेले नाही, असे समजण्यात यावे.-न्या. ए. एम. खानविलकर, दिनेश माहेश्वरी, अनिरुद्ध बोस

 

टॅग्स :SchoolशाळाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय