शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आधार कार्ड वैध की अवैध? आज सर्वोच्च न्यायालय सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 08:46 IST

आधार कार्डच्या वैधतेबद्दल चार महिने चालला युक्तिवाद

नवी दिल्ली: आधार कार्डच्या वैधतेबद्दल आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. आधार कार्डच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या 27 याचिकांवर जवळपास चार महिने न्यायालयात युक्तिवाद चालला. यानंतर सर्वोच्च न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला. हा निकाल आज न्यायालयाकडून सुनावण्यात येईल. आधार कार्डच्या वैधतेबद्दलची सुनावणी जानेवारीत सुरु झाली. जवळपास 38 दिवस या प्रकरणी युक्तिवाद सुरू होता. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठानं केंद्र सरकार आणि याचिकाकर्त्यांचा युक्तीवाद ऐकला. आधार कार्डमुळे नागरिकांच्या गोपनीयतेच्या अधिकाराचा भंग होतो का, याचा निर्णय सरकारला घ्यावा लागेल. गोपनीयतेचा अधिकार हा संविधानानं प्रत्येक नागरिकाला दिलेला मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे याबद्दल सरकार काय भूमिका घेतं, हे पाहणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे. केंद्र सरकारनं कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य केलं होतं. त्यामुळे बँक खातं उघडण्यासाठी, पॅन कार्ड, पासपोर्ट, वाहन परवाना तयार करण्यासाठी आधार कार्डची सक्ती करण्यात आली. मोबाईल नंबर, बँक खातंदेखील आधारशी जोडण्याच्या सूचना सरकारनं दिल्या होत्या. मात्र यावर याचिकाकर्त्यांनी आक्षेप नोंदवला. यामुळे नागरिकांच्या मूलभूत अधिकाराचा भंग होत असून गोपनीयता संपुष्टात येत असल्याचं याचिकाकर्त्यांनी म्हटलं. तर सरकारी योजनांच्या लाभार्थींना थेट अनुदान देता यावं, त्यात कोणताही घोटाळा होऊ नये, यासाठी आधार कार्ड अनिवार्य केल्याचा दावा केंद्र सरकारकडून न्यायालयात करण्यात आला.  

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डSupreme Courtसर्वोच्च न्यायालयNarendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकार