शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
2
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
3
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
4
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
5
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
6
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
7
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
8
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
9
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
10
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
11
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
12
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
13
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
14
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
15
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
16
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
17
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
18
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
19
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
20
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?

सेटलवाड यांच्या निकालात सुप्रीम कोर्टाने मर्यादा ओलांडल्या; प्रख्यात विधिज्ञ दुष्यंत दवे यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 12:05 IST

गुजरात दंगलीप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक उच्चपदस्थांना गुजरात एसआयटीने क्लीन चिट दिली होती.

नवी दिल्ली : गुजरात दंगलीप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्या विरोधात निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने सर्व सीमा, मर्यादा ओलांडल्या, असे मत प्रख्यात विधिज्ञ दुष्यंत दवे यांनी व्यक्त केले. गुजरात दंगलीबाबत झाकिया जाफरी विरु्दध गुजरात सरकार या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर गुजरात पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड व गुजरातचे माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक आर. बी. श्रीकुमार यांना अटक केली होती.

गुजरात दंगलीप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक उच्चपदस्थांना गुजरात एसआयटीने क्लीन चिट दिली होती. त्याला आव्हान देणारी झाकिया जाफरी यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. तसेच तिस्ता सेटलवाड यांची स्वयंसेवी संस्था व अन्य काही जणांनी खोटे पुरावे सादर केल्याचे ताशेरे ओढले होते.सेटलवाड व श्रीकुमार, संजीव भट्ट यांच्या विरोधातील  निकालामुळे मी अस्वस्थ झालो. असा निकाल देऊन सर्वोच्च न्यायालयाने चुकीचा संदेश दिला आहे असे दवे यांनी म्हटले आहे.

एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत दवे म्हणाले की, २००२च्या गुजरात दंगलीप्रकरणी अनेक प्रकरणांत विधिज्ञ हरीश साळवे यांनी न्यायमित्र म्हणून काम पाहिले होते. तिस्ता सेटलवाड या गुजरात एसआयटी व हरीश साळवे यांच्या नेहमी संपर्कात होत्या. तिस्ता यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा केवळ घटनाबाह्यच नव्हे तर नैतिकतेलाही धरून नाही असेही दवे म्हणाले. (वृत्तसंस्था)

‘गोध्रा प्रकरणी पोलिसांना अपयश’ 

ख्यातनाम विधिज्ञ दुष्यंत दवे म्हणाले की, गोध्रा येथील हत्याकांड रोखण्यात गुजरात पोलिसांना अपयश आले. गोध्रामध्ये हिंसाचार उसळण्याची शक्यता आहे, असे संकेत मिळाले होते. तरीही ते हत्याकांड न रोखू शकलेल्या पोलिसांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

टॅग्स :GujaratगुजरातSupreme Courtसर्वोच्च न्यायालय